घरCORONA UPDATELockDown: २० दिवस कामाविना बसून; ७ मजुरांनी केला ५०० किमीचा पायी प्रवास

LockDown: २० दिवस कामाविना बसून; ७ मजुरांनी केला ५०० किमीचा पायी प्रवास

Subscribe

झाशीमध्ये ७ कामगारांनी तब्बल ५०० किलोमीटरता रस्ता पायी चालत पार करून घर गाठले असल्याची घटना समोर येत आहे.

लॉकडाऊनमुळे जागोजागी अडकलेले कामगार, मजूर आता आपापल्या घराची वाट धरताना दिसत आहेत. खरंतर सध्या संचारबंदी असल्यामुळे कोणत्याच वाहतुकीला परवानगी नाही. मात्र हे मजूर मैलोन् मैल पायी चालत जाऊन घर गाठत आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या हाताचे काम थांबले असल्याचे पैशांची चणचण जाणूव लागल्यामुळेच कामगार, मजूर असे धाडस करत असल्याचे पाहायला मिळत आहे. झाशीमध्येही ७ कामगारांनी तब्बल ५०० किलोमीटरता रस्ता पायी चालत पार करून घर गाठले असल्याची घटना समोर येत आहे. मागील २० दिवसांपासून काम न करता बसून राहिल्यामुळे कामगारांनी घराकडे जाण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – CoronaVirus : कोरोनाविरूद्धच्या युद्धात मोदी जगात अव्वल; अमेरिकन संस्थेने केले मूल्यांकन

- Advertisement -

काय आहे प्रकरण 

काम बंद झाल्यामुळे तसेच त्यांच्याजवळील पैसेही संपल्याने हे कामगार बलरामपूर जिल्ह्यातील पाचपेडवा भागातील खदर या आपल्या गावी ५०० किलोमीटरचे अंतर पायी चालत पोहोचले. हा प्रवास करण्यासाठी त्यांना तब्बल ७ दिवस लागले. मात्र घरी पोहोचताच तेथील प्रशासनाने त्या कामगारांना क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगितले. यातील एका कामगाराची आई खुपच आजारी असल्यामुळेही त्याला घराचा ओढ लागली असल्याचे समजते. शिव प्रसाद असे या कामगाराचे नाव असून त्याने म्हटले आहे की, माझी ८० वर्षीय आई खुप आजारी असल्याची माहिती मला मिळाली होती. त्यामुळे मी तातडीने घरी जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही आमच्यासोबत खाण्याची कोणतीही वस्तू घेतली नाही. मात्र भुकेने आमचा मार्ग अडला नाही. आमचे लक्ष हे केवळ लवकरात लवकर घर गाठणे इतकेच होते, असेही त्याने सांगितले. दरम्यान, तेथील पोलिसांनी या कामगारांना १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -