घरताज्या घडामोडीTrain Accidents In India: 2011 नंतर आतापर्यंत घडलेले 8 भीषण रेल्वे अपघात, कधी अन् कुठे?

Train Accidents In India: 2011 नंतर आतापर्यंत घडलेले 8 भीषण रेल्वे अपघात, कधी अन् कुठे?

Subscribe

ओडिशा रेल्वे अपघातानंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात आतापर्यंत 261जणांचा मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी अद्यापही बचाव कार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 1999 मध्ये सर्वात मोठा अपघात हा पश्चिम बंगालमध्ये झाला होता. परंतु 2011 नंतर आतापर्यंत देशात 8 मोठे रेल्वे अपघात झाले.

कधी अन् कुठे झाले अपघात?

1) पश्चिम बंगालच्या गॅसलमध्ये 3 ऑगस्ट 1999 रोजी मोठा रेल्वे अपघात झाला होता. दिल्लीला निघालेली ब्रह्मपूत्र मेल आणि औंध-आसाम एक्स्प्रेसची समोरासमोर धडक झाली होती. या अपघातात 285 जणांचा मृत्यू झाला होता. तर या घटनेत 312 लोकं गंभीर जखमी झाले होते.

- Advertisement -

2) वर्ष 2011: 7 जुलै 2011 रोजी उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात छपरा-मथुरा एक्स्प्रेसची एका बसला धडक झाली होती. या घटनेत 69 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण जखमी झाले होते. दुपारी 1.55 वाजता हा अपघात घडला. ट्रेनचा वेग खूप होता आणि क्रॉसिंगवर आदळल्यामुळे बस अर्धा किलोमीटरपर्यंत पुढे घसरली होती.

3) वर्ष 2012: 22 मे 2012 रोजी आंध्र प्रदेशजवळ मालगाडी आणि हुबळी-बंगळुरू हम्पी एक्सप्रेसची रेल्वे अपघातात धडक झाली. रेल्वेचे चार डबे रुळावरून घसरल्याने आणि त्यातील एका डब्याला आग लागल्याने सुमारे 25 जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे 43 जण जखमी झाले.

- Advertisement -

4) वर्ष 2014: 26 मे 2014 रोजी उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर भागात गोरखपूरच्या दिशेने जाणारी गोरखधाम एक्स्प्रेस खलीलाबाद स्टेशनजवळ थांबलेल्या मालगाडीला धडकली, ज्यात 25 जण ठार तर 50 हून अधिक जण जखमी झाले.

5) वर्ष 2016 : 20 नोव्हेंबर 2016 रोजी इंदूर-पाटणा एक्स्प्रेस 19321 चे 14 डबे उत्तर प्रदेशातील कानपूर शहरापासून 100 किमी अंतरावर असलेल्या पुखरायनजवळ रुळावरून घसरले, या दुर्घटनेत 150 प्रवासी ठार आणि 150 हून अधिक जखमी झाले.

6) वर्ष 2017: 23 ऑगस्ट 2017 रोजी उत्तर प्रदेशातील औरेयाजवळ दिल्लीहून जाणाऱ्या कैफियत एक्स्प्रेसचे नऊ डबे रुळावरून घसरले आणि सुमारे 70 जण जखमी झाले.

7) वर्ष 2022: 13 जानेवारी 2022 रोजी पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार भागात बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचे सुमारे 12 डबे रुळावरून घसरले. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 36 जण जखमी झाले आहेत.

8) वर्ष 2023: हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे. 2 जून रोजी, ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरू-हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडी रुळावरून घसरल्याने 250 हून अधिक जण ठार झाले आणि 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.


हेही वाचा : Odisha train accident : रेल्वे सुरक्षा आयोगामार्फत चौकशी करण्याची ममता बॅनर्जी यांची


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -