घरदेश-विदेश८० वर्षांच्या वृद्ध महिलेने राहुल गांधींच्या नावावर केली सर्व संपत्ती, जाणून घ्या...

८० वर्षांच्या वृद्ध महिलेने राहुल गांधींच्या नावावर केली सर्व संपत्ती, जाणून घ्या कारण

Subscribe

उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये राहणाऱ्या एका ८० वर्षांच्या वृद्ध महिलेने सोमवारी न्यायालयात मृत्यूपत्र सादर करून आपली सर्व मालमत्ता काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या नावावर केली आहे. मृत्युपत्रात आपल्या मालमत्तेची संपूर्ण माहिती देताना, ८० वर्षीय पुष्पा मुंजियाल यांनी त्यांच्या संपूर्ण मालमत्तेची मालकी राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्याची विनंती न्यायालयाला केली. यासंदर्भातील माहिती देताना डेहराडून मेट्रोपॉलिटन काँग्रेसचे अध्यक्ष लालचंद शर्मा यांनी सांगितले की, पुष्पा मुंजियाल यांनी यमुना कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष प्रीतम सिंह यांना मालमत्तेचे मृत्यूपत्र सुपूर्द केले.

यासाठी राहुल गांधींच्या नावावर केली संपत्ती

पूर्वी सरकारी शाळेत शिक्षिका असलेल्या मुंजियाल सांगतात की राहुल गांधी यांच्या विचारांचा खूप प्रभाव असल्याने त्यांनी त्यांची मालमत्ता त्यांना दिली आहे. ते म्हणाले की, देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत गांधी घराण्याने नेहमीच पुढे जाऊन देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. इंदिरा गांधी असोत की राजीव गांधी, त्यांनी देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी बलिदान दिले. तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी देशसेवेसाठी स्वतःला झोकून दिले आहे, असं त्या म्हणाल्या.

- Advertisement -

आपल्या वडिलांचे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचेही या वृद्ध महिलेने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या ८० वर्षीय पुष्पा मुंजियाल सध्या डेहराडूनमधील प्रेमधाम वृद्धाश्रमात राहत आहेत. त्याचवेळी कोर्टात आपल्या मालमत्तेची संपूर्ण माहिती देताना मुंजियाल यांनी राहुल गांधी यांच्या नावाने मृत्युपत्र सादर केले आणि माझ्या मृत्यूनंतर माझ्या संपूर्ण मालमत्तेची मालकी त्यांच्याकडे सोपवण्यात यावी, असे सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -