घरदेश-विदेशमानवी तस्करीतून सुटका झालेल्या ९ मुली आश्रमातून बेपत्ता

मानवी तस्करीतून सुटका झालेल्या ९ मुली आश्रमातून बेपत्ता

Subscribe

दिल्ली उपमुख्यमंत्र्यांनी दक्षिण -पूर्व जिल्ह्याच्या महिला आणि बाल विकास विभागाचे अधिकारी आणि आश्रमाच्या सुपरिटेंडेटला निलंबित करण्यात आले आहे. जीटीबी एनक्लेव पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.

दिल्लीच्या एका आश्रमातून ९ मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिल्लीच्या संस्कार आश्रम फॉर गर्ल्स या आश्रमामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे दिल्लीमध्ये खळबळ उडाली आहे. मुली गायब झाल्याची माहिती मियलताच दिल्ली महिला आयोगाने उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना तातडीने याची माहिती दिली. आज सकाळी ७ वाजता महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल या आश्रमात पोहचल्या. मनोज सिसोदिया यांनी या प्रकरणी चौकशीचे तसेच कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी दक्षिण -पूर्व जिल्ह्याच्या महिला आणि बाल विकास विभागाचे अधिकारी आणि आश्रमाच्या सुपरिटेंडेटला निलंबित करण्यात आले आहे. जीटीबी एनक्लेव पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.

बेपत्ता झाल्याची अधिकाऱ्यांना माहिती नव्हती

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना पत्र लिहून लवकरात लवकर बेपत्ता मुलींचा शोध घेण्याची मागणी केली आहे. याप्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचने करावा तसंच याप्रकरणातील दोषींना कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. १ डिसेंबर म्हणजे शनिवारी रोजी रात्री मुली बेपत्ता झाल्याची घटना घडली. दिलशाद गार्डन परिसरातील संस्कार आश्रमातून ९ मुली बेपत्ता झाल्या. मात्र मुलीच्या बेपत्ता होण्याची कोणालाच माहिती नव्हती. २ डिसेंबर रोजी मुली बेपत्ता झाल्याचं समोर आलं. याप्रकरणी जीटीबी एनक्लेव पोलीस ठाण्यात २ डिसेंबरला एफआयआर दाखल करण्यात आली.

- Advertisement -

आरोपींना अटक करुन कारवाई करा

स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, आश्रमातून अचानक ९ मुली बेपत्ता होणे ही धक्कादायक बाब आहे. यामधील काही मुली अशा आहेत ज्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी मानवी तस्करांच्या जाळ्यातून सुटका करण्यात आली होती. जे कोणी या प्रकरणात दोषी आहेत त्यांना अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. महिला आयोगाने खूप मेहनत करुन या मुलींची मानवी तस्करीतून सुटका करतो आणि काही अधिकारी या मुलींना परत मानवी तस्करीच्या दलदलमध्ये ढकलतात. याआधी बिहारमधील मुजफ्फरपूर आणि उत्तर प्रदेशातील देवरियातील आश्रमशाळेतूनही मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

हेही वाचा – 

बापरे!२०१३ पासून मुंबईतून २,२६४ महिला बेपत्ता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -