घरदेश-विदेश'चांद का टुकड़ा' विक्रीला, जाणून घ्या किंमत

‘चांद का टुकड़ा’ विक्रीला, जाणून घ्या किंमत

Subscribe

या चंद्राच्या तुकड्याची विक्री ब्रिटनची क्रिस्टी ही लिलाव कंपनी करणार आहे.

लोक बरेचदा आपल्या प्रियजनांना असं म्हणतात की ‘मी तुझ्यासाठी चंद्र आणि तारे आणू शकतो’. आत्तापर्यंत ही एक म्हण होती. मात्र, आता ही म्हण खरी ठरु शकते. आता चंद्राचा एक तुकडा विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. या चंद्राच्या तुकड्याचे वजन १३.५ किलो आहे. हा जगातील सर्वात मोठा चंद्र उल्का आहे आणि गुरुवारपासून खासगी विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

moon slice

- Advertisement -

काय आहे किंमत?

या चंद्राच्या तुकड्याची विक्री ब्रिटनची (लिलाव हाऊस) क्रिस्टी ही लिलाव कंपनी करणार आहे. त्याची किंमत २० लाख पाऊंड म्हणजेच सुमारे १८ कोटी ७८ लाख रुपये आहे. असे म्हटलं जातं की चंद्राचा हा तुकडा लघुग्रह किंवा धूमकेतूला धडकल्यानंतर पडला आणि नंतर तो सहारा वाळवंटात पडला. त्याला एनडब्ल्यूए १२६९१ असं नाव देण्यात आलं आहे.


हेही वाचा – भारतीय वंशाच्या मुलीने दिलं नासाच्या पहिल्या मंगळ हेलिकॉप्टरला नाव

- Advertisement -

क्रिस्टीचे विज्ञान आणि नैसर्गिक इतिहासाचे प्रमुख जेम्स हिस्लॉप म्हणाले, “जगाचा दुसरा तुकडा तुमच्या हातात ठेवण्याची संधी तुमच्याकडे आहे, जी तुम्ही कधीही विसरणार नाही. तो चंद्राचा एक वास्तविक तुकडा आहे. हा एका फुटबॉलच्या आकारासारखा आहे, त्याला किंचितसा तिरकस आहे, आपल्या डोक्यापेक्षा किंचित मोठा आहे.”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -