घरदेश-विदेशपती आणि मुलासमोर महिलेवर सामुहिक बलात्कार

पती आणि मुलासमोर महिलेवर सामुहिक बलात्कार

Subscribe

कोलकाता सामुहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरु आहे.

कोलकातामध्ये महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पती आणि मुलासमोर दोन नराधमांनी महिलेवर बलात्कार केलाय. पश्चिम बंगालमधील कुचबिहार जिल्ह्यातील सीतलकुची गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लग्नसमारंभात महिलेसोबत केला होता डान्स

मंगळवारी रात्री एका लग्न समारंभानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पीडित महिलेने डान्स केला होता. त्यावेळी दोन्ही आरोपींनी देखील या महिलेसोबत डान्स केला होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर पीडित महिला तिच्या कुटुंबियांसोबत घरी जात होती. या दोन्ही आरोपींनी देखील त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्या घरी गेले.

- Advertisement -

पती आणि मुलासमोर केला बलात्कार

मध्यरात्री दोन्ही आरोपी या महिलेच्या घरामध्ये घुसले. त्यांनी पीडित महिलेच्या पतीला बांधून ठेवले. त्यानंतर तिच्या लहान मुलाच्या गळ्यावर चाकू ठेवून तिच्याकडे शारीरिकसंबंध ठेवण्याची मागणी केली. जेव्हा महिलेने त्यांना नकार दिला. तेव्हा या नराधमांनी तिच्या पती आणि मुलासमोरच तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.

आरोपींच्या मुसक्या आवळल्या

पीडित महिलेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपींविरोधात बुधवारी संध्याकाळी गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपासाला वेग आणत पोलिसांनी पिंकू बर्मन आणि कृष्णा बर्मन या दोन्ही आरोपींना अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -