घरCORONA UPDATEVideo : आमिर खानने गरीबांना १ किलो गव्हाच्या पीठातून दिले १५ हजार...

Video : आमिर खानने गरीबांना १ किलो गव्हाच्या पीठातून दिले १५ हजार रूपये?

Subscribe

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खानने लॉकडाऊनच्या काळात पुढाकार घेतला आहे.

लॉकडाऊनच्या या कठीण काळात सेलेब्रेटींनी गरिबांना मदतीचा हात पुढे केला आहे. यात अक्षय कुमार, शहारूख खान ही नावं आघाडीवर आहेत. सध्या टिक टॉकवर आणखी एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओत असा दावा केला जात आहे की, आमिर खानने कोरोना व्हायरसच्या या लढाईत गरीब लोकांच्या सहकार्य करण्यासाठी १ किलो गव्हाच्या पीठात १५ हजार रूपये वाटले आहेत. हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने लॉकडाऊनच्या काळात पुढाकार घेतला आहे. पण त्याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात असे म्हटले आहे की, आमिर खानने कोरोना व्हायरसच्या काळात गरिबांना मदत करण्यासाठी १ किलो गव्हाचे पीठ वाटले. पण या पीठाच्या पिशवीत प्रत्येकी १५ हजार रूपये होते. मात्र या व्हीडिओच्या सत्यतेबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाहीये. टिकटॉक व्हीडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की आमिर खानने १५ हजार रूपये वाटले.

@khansaheb028Thanks sir ☺️ ##fyp ##tiktokindia ##foryoupage @tiktok_india @chimi15051986

♬ original sound – Crazy traveller

- Advertisement -

 आमिर खानने गरिबांना वाटण्यासाठी एक गव्हाच्या पीठाच्या पँकेटने भरलेला ट्रक पाठवला. या व्हीडिओत म्हटले आहे की, गरीबांना वाटण्यासाठी एक ट्रक २३ एप्रिलला दिल्लीच्या एका ठिकाणी पोहचला. यात एक- एक किलोच्या गव्हाच्या पिशव्या होत्या.

या व्हीडिओत दिसत आहे की अनेकांनी एक एख किलोची पाकीटं घेण्यास नकार दिला. पण ज्यांन ही पाकीटं घेतली आणि घरी गेल्यावर उघडून बघितली त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. कारण पीठाच्या प्रत्येक पाकिटात जवळपास १५ हाजर रूपये होते. हे कारण्या मागचं कारण म्हणजे ज्याला खरच गरज आहे अशा लोकांपर्यंत ते पाकिट पोहचेल. मात्र हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर आमिर खान कडून कोणतच अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही.

- Advertisement -

हे ही वाचा – Hundred Web Series Review: पुन्हा एकदा रिंकूने जिंकली प्रेक्षकांची मनं!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -