घरताज्या घडामोडीकंगनाला वाढदिवसाचं मिळालं खास गिफ्ट, पुन्हा एकदा ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

कंगनाला वाढदिवसाचं मिळालं खास गिफ्ट, पुन्हा एकदा ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

Subscribe

६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची (67th National Film Awards) घोषणा झाली आहे. वाढदिवसाच्या एक दिवसापूर्वीच वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असलेली बॉलिवूडची कॉन्ट्रोवर्सी क्वीन कंगना रनौतला खास गिफ्ट मिळाले आहे. ते म्हणजे कंगनाला पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ चित्रपटाकरता सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कंगनाला जाहीर झाला आहे. तर ‘भोंसले’ चित्रपटाकरता अभिनेता मनोज वाजपेयी आणि ‘असुरन’ या तामिळ चित्रपटाकरता धनुष या दोघांना सर्वोत्कृष्ट अभिनेता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

आज (सोमवार) राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात ६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जल्लोषात पार पडला. ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ चित्रपटाकरता कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्याने सध्या तिचे चाहते फार खुश झाले असून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. ‘मणिकर्णिका’ चित्रपट २५ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर जरी या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी मात्र कंगनाच्या या चित्रपटातील अभिनयाची चांगलीच वाहवा झाली. त्यानंतर कंगनाचा २४ जानेवारी २०२० रोजी ‘पंगा’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कंगनाने महिला कबड्डी खेळाडूची भूमिका साकारली होती.

- Advertisement -

याआधी देखील कंगनाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. २००८ मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर २०१४ मध्ये ‘क्वीन’ तर २०१५ साली ‘तन्नू वेड्स मन्नू’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता.

- Advertisement -

हेही वाचा – Photo: पाहा मौनी रॉयचा ब्लू ड्रेसमधला ग्लॅमरस लूक


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -