घरदेश-विदेशअभिनेत्री अपर्णा सेनचे ममता बॅनर्जींना आवाहन

अभिनेत्री अपर्णा सेनचे ममता बॅनर्जींना आवाहन

Subscribe

प. बंगालमध्ये डॉक्टरांनी पुकारलेला संप आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे. याबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांबरोबर चर्चा करावी असे आवाहन अभिनेत्री अपर्णा सेन यांना केले आहे.

कोलकातामधील सरकारी हॉस्पीटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकाने एका इन्टर्न डॉक्टरवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ कोलकातासह देशभरात कनिष्ठ डॉक्टर्सने आंदोलनाला सुरूवात केली. कोलकात्यात मागील ४ दिवसांपासून डॉक्टर संपावर गेले आहेत. याबाबत अभिनेत्री अपर्णा सेनने प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आवाहन केले आहे.

अभिनेत्री अपर्णा सेन यांनी आपल्या आवाहनात मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना तुम्ही आमच्या आई आहात ना? अशी सुरूवात करून डॉक्टरांसोबत चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. अपर्णा सेन म्हणातात की, ”प्रिय मुख्यमंत्री, तुम्ही आमचे पालक आहात, तुम्ही आमच्या आईसारख्या आहात… तुम्ही त्या तरुण डॉक्टरांपेक्षा मोठ्या आहात… कृपया त्याची काळजी घ्या… या ठिकाणी राज्यमंत्री येवून गेले आहेत… पण कृपया तुम्ही या ठिकाणी या आणि या डॉक्टरांबरोबर चर्चा करा.”,असे आवाहन अपर्णा सेन यांनी ममता बॅनर्जींना केले आहे.

- Advertisement -

…तर राज्यातील जनता विरोधात जाईल

यापूर्वीही अपर्णा सेन यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती. भाजपच्या ‘जय श्री राम’ या अभियानावर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया देवून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. यावेळी अपर्णा सेन यांनी विचार न करता काहीही केल्यास किंवा बोलल्यास राज्यातील जनता ममता बॅनर्जींच्या विरोधात जावू शकते असे अपर्णा सेन यांनी म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -