घरताज्या घडामोडीअफगाणिस्तानमध्ये दुकानांबाहेर का सजवून ठेवले जात आहेत महिला पुतळयांचे मुंडके?

अफगाणिस्तानमध्ये दुकानांबाहेर का सजवून ठेवले जात आहेत महिला पुतळयांचे मुंडके?

Subscribe

तालिबान्यांचे राज्य असलेल्या अफगाणिस्तानमधील हेरात प्रांतातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक तालिबानी कपड्यांच्या दुकांनामध्ये ठेवण्यात आलेल्या महिला पुतळयाचे मुंडके छाटत असल्याचे दिसत आहे.

संपूर्ण जग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत असतानाच अफगाणिस्तान मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. तालिबान्यांचे राज्य असलेल्या अफगाणिस्तानमधील हेरात प्रांतातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक तालिबानी कपड्यांच्या दुकांनामध्ये ठेवण्यात आलेल्या महिला पुतळयाचे मुंडके छाटत असल्याचे दिसत आहे. तर आजूबाजूला उभे असलेले लोकं अल्ला हू अकबरचे नारे देत हसताना दिसत आहेत.

- Advertisement -

हेच मुंडके नंतर दुकानांमध्ये सजवून ठेवले जात आहेत. तालिबान सरकारने तसा आदेश दिला आहे. कपड्यांच्या दुकानात ठेवण्यात येणाऱ्या मॉडेल्सचे पुतळे हे इस्लामचा अपमान करणारे आहेत. यामुळे त्यांना दुकांनातून हटवण्याचे आदेश तालिबानने दिले आहेत. हेरात मध्ये या मूर्तींची पूजा केली जात आहे आणि इस्लाममध्ये अल्लाह शिवाय कोणीही पूजनीय नाही. यामुळे या पुतळ्यांचे मुंडके छाटून ते गैरइस्लामी असल्याचे सांगण्यात येत आहे. हेच दर्शवण्यासाठी कपड्यांच्या दुकानातील महिला पुतळयांचे मुंडके तोडले जात आहेत.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून महिलांवरील बंधनात वाढ होत आहे. अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून महिलांवर तालिबान्यांकडून अत्याचार केले जात आहेत. यावर जगभरातून टीका केली जात आहे. आता तर महिलांचे पुतळेही तोडले जात असल्याने तालिबानी राजवटीत महिलांचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -