घरताज्या घडामोडीधक्कादायक! कोरोनापाठोपाठ भारतात 'या' फ्लूचा शिरकाव; चिंतेत वाढ

धक्कादायक! कोरोनापाठोपाठ भारतात ‘या’ फ्लूचा शिरकाव; चिंतेत वाढ

Subscribe

कोरोना पाठोपाठ आता एका फ्लूने भारतात पहिल्यांदा प्रवेश केला आहे. त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. देशात आतापर्यंत कोरोना विषाणूने कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४० हजारावर गेला आहे. तर १ हजार ३०० लोकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. त्यामुळे या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरता सरकारकडून विविध प्रयत्न आणि उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, या कोरोनाचे देशावर संकट असताना आता पुन्हा एक नवे संकट देशावर येऊन धडकले आहे.

हा आहे फ्लू

देशात पहिल्यांदाच आफ्रिकी स्वाईन फ्लूने शिरकाव केला आहे. आधीच कोरोनाचे संकट आणि त्यात आफ्रिकी स्वाईन फ्लू आल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या फ्लूचा डुक्करांना फटका बसत असून या ‘आफ्रिकी स्वाईन फ्लू’मुळे आसाममध्ये २ हजार ५०० हून अधिक डुक्करांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

राज्यातील ३०७ गावांमध्ये या फ्लूचा शिरकाव

राज्यातील ३०७ गावांमध्ये या आफ्रिकी स्वाईन फ्लूने शिरकाव केला असून या गावातील एकूण २ हजार ५०० हून अधिक डुक्करांचा मृत्यू झाला असल्याची माहि आसाम सरकारने दिली आहे.

केंद्र सरकारने डुक्करांना मारण्याची मंजुरी दिली आहे. परंतु, राज्य सरकार त्यांना मारण्याऐवजी आफ्रिकी स्वाईन फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग शोधणार आहेत. – अतुल बोरा, पशुपाल आणि पशु चिकित्सक मंत्री; आसाम

- Advertisement -

कोरोना व्हायरसची संबंध नाही

या फ्लूचा कोरोना व्हायरसशी संपर्क नाही. तसेच हा आफ्रिकी स्वाईन फ्लू असल्याचे राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग संस्था, भोपाळ यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे अशा फ्लूने भारतात प्रथमच प्रवेश केला आहे.


हेही वाचा – भारतामध्ये मुस्लीम अस्पृश्य झाले आहेत का?; UAE च्या राजकुमारीचा संतप्त सवाल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -