घरदेश-विदेशपेट्रोल-डिझेल नंतर आता वीजही महागणार

पेट्रोल-डिझेल नंतर आता वीजही महागणार

Subscribe

देशात औष्णिक ऊर्जेची वाढती मागणी आणि कोळशाचे कमी होणारे प्रमाण यामुळे विजेच्या किंमतीने दोन वर्षांपासून उच्चांक गाठला आहे. हा उच्चांक प्रतियुनिट ६.२० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर कित्येक राज्यांच्या नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. यापूर्वी २०१६ मध्ये विजेच्या दराने प्रति युनिट ६ रुपयांचा उच्चांक गाठला होता.

मागील आठवड्यात विजेचे दर प्रति युनिट ४ रुपये होते. परंतु, उकाडा वाढल्याने विजेची मागणी वाढली आहे. त्यामानाने कोळशाच्या पुरवठ्यात कमतरता जाणवू लागली आहे. पश्चिम भारतातून उत्तर भारतात वाहून जाणाऱ्या विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या आठवड्यात विजेच्या दरात प्रति युनिट २ रुपयांनी वाढ झाली. काही राज्यांमध्ये हा दर प्रतियुनिट ८ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

- Advertisement -

काही विश्लेषकांनी सांगितले आहे की, विजेच्या दरातील वाढ काही दिवसांनंतर पुन्हा कमी होईल. सध्या गुजरात, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तमिलनाडू या राज्यांमधली वीज वितरण कंपन्यांना वीज पुरवठ्यासाठी वीज कमी पडते आहे. जर त्यांना वीज महागात मिळणार असेल तर त्याचा भार कारखाने आणि सामान्य नागरिकांवर पडणार आहे.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -