घरताज्या घडामोडीअग्निपथ योजनेंतर्गत जात प्रमाणपत्र का घेतले जाते? लष्करी अधिकाऱ्यांनी दिलं स्पष्टीकरण

अग्निपथ योजनेंतर्गत जात प्रमाणपत्र का घेतले जाते? लष्करी अधिकाऱ्यांनी दिलं स्पष्टीकरण

Subscribe

आपचे खासदार संजय सिंह आणि जदयूचे नेते उपेंद्र कुशवाहा यांनी सैन्य भरतीसंदर्भातील एक स्क्रीन शॉट शेअर करून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सैन्य भरतीसाठी जाती किंवा धर्म प्रमाणपत्राची काय आवश्यकता आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. सैन्य भरतीसाठी पहिल्यांदाच जातीचं प्रमाणपत्र मागितले जात असल्याचा दावाही संजय सिंह यांनी केला होता.

अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात भरती होण्याकरता उमेदवारांकडून जात प्रमाणपत्र घेण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र, यावर आता लष्कारने स्पष्टीकरण दिलं आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्य भरतीच्या प्रक्रियेत कोणतेही बदल केले नाहीत. तसेच, याआधीच्या सैन्य भरती प्रक्रियेत जात आणि धर्माचं प्रमाणपत्र मागितले जायचे, त्यानुसारच अग्निपथ योजनेत जात प्रमाणपत्र मागितले जात आहे. (Agneepath Scheme: Caste And Religion Certificate Was Also Sought, Army Clarified On Questions Raised On Military Recruitment)

हेही वाचा – सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘अग्निपथ’शी संबंधित सर्व याचिका दिल्ली हायकोर्टात वर्ग

- Advertisement -

आपचे खासदार संजय सिंह आणि जदयूचे नेते उपेंद्र कुशवाहा यांनी सैन्य भरतीसंदर्भातील एक स्क्रीन शॉट शेअर करून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सैन्य भरतीसाठी जाती किंवा धर्म प्रमाणपत्राची काय आवश्यकता आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. सैन्य भरतीसाठी पहिल्यांदाच जातीचं प्रमाणपत्र मागितले जात असल्याचा दावाही संजय सिंह यांनी केला होता.

जात प्रमाणपत्र का घेतलं जातं?

- Advertisement -

प्रत्येक ठिकाणी जात प्रमाणपत्र घेतले जातात. शाळा-महाविद्यालयातील प्रवेशासाठीही जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सैन्य भरतीसाठीही जात प्रमाणपत्र देणे गरजेचं आहे. मात्र, इथे जातनिहाय आरक्षण नसूनही जात प्रमाणपत्र का घेतले जातात असा प्रश्न विचारला जातो. प्रशिक्षण आणि तैनाती दरम्यान एखादा सैनिक जर शहीद झाला तर त्याच्या धर्मानुसार अंत्यविधी करण्यासाठी सैन्य भरतीसाठी जात प्रमाणपत्र मागितले जाते.

हेही वाचा – आजपासून संसदेच पावसाळी अधिवेशन; अग्निपथसह अनेक मुद्द्यावरून विरोधक होणार आक्रमक

भाजप खासदाराकडून आक्षेप

लष्करी भरतीसाठी कोणतेही जातीनिहाय आरक्षण नाही, तरीही जात प्रमाणपत्र का मागितले जाते. आता जात पाहून राष्ट्रभक्ती ठरवली जाणार का असा सवाल भाजपचे खासदार वरूण गांधी यांनीही विचारला होता.

भारतीय लष्काराला बदनाम करण्याचं षडयंत्र – संबित पात्रा

काँग्रेस आणि आम आदमी पार्टी नेहमीच भारतीय लष्करावर प्रश्न उभे करतात. भारतीय लष्काराला बदनाम करण्याचं काम यांच्याकडून केलं जातं, असा घणाघात भाजचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत केली.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -