घरक्राइमधक्कादायक! अहमदाबादमध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांची हत्या; आरोपी अद्याप फरार

धक्कादायक! अहमदाबादमध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांची हत्या; आरोपी अद्याप फरार

Subscribe

एकाच कुटुंबातील ४ जणांची हत्या करून त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवलेल्याची घटना गुजरातची राजधानी अहमदाबाद घडली आहे. अहमदाबादमध्ये ओढव नावाचा एक भाग आहे. या परिसरात ही घटना घडली असून, या हत्याकांडामुळं अहमदाबाद हादरलं आहे.

एकाच कुटुंबातील ४ जणांची हत्या करून त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवलेल्याची घटना गुजरातची राजधानी अहमदाबाद घडली आहे. अहमदाबादमध्ये ओढव नावाचा एक भाग आहे. या परिसरात ही घटना घडली असून, या हत्याकांडामुळं अहमदाबाद हादरलं आहे. घरात झालेल्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हत्ये मागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका मराठी इसमानं ही हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, विनोद मराठी नावाच्या संशयीत आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये ओढव नावाचा भाग आहे. या भागात दिव्य प्रभा नावाची सोसायटी आहे. ह्या सोसायटीतल्या एका घरातून दुर्गंध येत होता. याची माहिती मिळताच स्थानिकांना तपासणी केला असता त्यावेळी त्यांना खोलीचे दार बंद असल्याचं दिसलं. दरम्यान, ज्या घरातून दुर्गंध येत होता, त्या घरात रहिवाशांनी व सोसायटीच्या काही पदाधिकाऱ्यांनी डोकावण्याचा प्रयत्न केला पण घराला बाहेर कुलूप होतं.

- Advertisement -

पण सतत येत असलेली दुर्गंधी लक्षात घेऊन स्थानिकांनी पोलीसांना फोन करुन यासंदर्भात माहिती दिली. स्थानिकांच्या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेतली. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी दुर्गंध येत असल्याचं पाहता घराचं कुलूप तोडलं. घराचं दार उघडताच आतून दुर्गंधीचा लोट बाहेर आला. त्यामुळं काही तरी भयंकर घरात घडलं असावं असा अंदाज पोलीसांना आलाच. पोलीसांनी संपूर्ण घराची तपासणी केली असता त्यांना घरातल्या वेगवेगळ्या खोलीत ४ मृतदेह चित्रविचित्र अवस्थेत पडल्याचं आढळलं.

पोलिसांनी मृतदेहांची तपासणी केला असता, मृतदेह सडले असल्यानं संबंधित परिसरात दुर्गंधी पसरल्याचं स्पष्ट झालं. पण हा सर्व नेमका काय प्रकार? ही घटना नेमकी काय? याबाबत पोलिसांना अस्पष्टता होती. दरम्यान, याप्रकरणी पोलीसांनी अधिक तपास केला असता, पोलिसांना ज्या कुटंबातील सद्यस्यांची हत्या केली ते मराठी कुटुंब असल्याची माहिती मिळाली.

- Advertisement -

पोलिसांना स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे एक ‘मराठी’ कुटुंब आहे. म्हणजेच कुटूंब मराठी आहे की त्यांचं आडनाव मराठी आहे याची अजून सविस्तर माहिती नाही. पण कुटुंबातल्या वादातूनच विनोद मराठी ह्या संशयीत आरोपीनंच स्वत:च्या कुटुंबाचा खात्मा केल्याची प्राथमिक माहिती आहे. विनोद मराठीनेच पत्नी सोनल मराठी, मुलगी प्रगती, मुलगा गणेश आणि सासू सुभद्राबाई यांचा खून केल्याचा संशय आहे. पण सध्या तरी विनोद मराठी हा फरार आहे. हे हत्याकांड चार दिवसांपूर्वी झाल्याचा संशय आहे. सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.


हेही वाचा – Sri Lanka Economic Crisis: ‘ती’ घटना समजताच परराष्ट्र मंत्री झाले विचलित, अधिकाऱ्यांना दिले आदेश

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -