घरदेश-विदेशविमानातील १३६ प्रवासी थोडक्यात बचावले

विमानातील १३६ प्रवासी थोडक्यात बचावले

Subscribe

मालदीवकडे जाण्यासाठी उड्डाण घेतलेल्या एअर इंडियाच्या विमानातील १३६ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.

केरळच्या थिरुअनंतरपुरम येथून मालदीवकडे जाण्यासाठी उड्डाण घेतलेल्या एअर इंडियाच्या विमानातील १३६ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. हे विमान मालदीवच्या माले वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बंद असलेल्या धावपट्टीवर उतरवण्यात आले. या विमानाचे दोन्ही टायर फुटले असल्याने अक्षरश: विमानाला ट्रॅक्टरने ओढून पार्किंगमध्ये लावण्यात आले असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

थिरुअनंतरपुरम येथून मालदीवकडे जाण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतले. एअर इंडियाच्या माहितीनुसार AI263 या विमानाला चुकीचा संदेश मिळाल्याने माले वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बांधकाम सुरु असलेल्या धावपट्टीवर उतरवण्यात आले. त्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले. दरम्यान, या विमानातून प्रवास करणारे १३६ प्रवाशांसहित क्रू मेंबर्स पूर्णत: सुरक्षित आहेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

एका महिन्यात दुसरी घटना

एका महिन्यात भारतीय विमान कंपनीसोबत अशी दुसऱ्यांदा घटना घडली आहे. ऑगस्ट महिन्यात अशीच एक घटना घडली होती. सौदी अरेबियातील रियाध विमानतळावर जेट एअरवेज विमान अपघात होण्यापासून थोडक्यात बचावला. हे विमान धावपट्टीवरुन खाली घसरल्याची घटना घडली होती. या विमानात १४२ प्रवासी आणि सात कर्मचारी प्रवास करीत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -