घरदेश-विदेशविमानात लघुशंका करणारा म्हणतो, तो मी नव्हेच!

विमानात लघुशंका करणारा म्हणतो, तो मी नव्हेच!

Subscribe

मिश्राची पोलीस कोठडी मिळावी यासाठी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला आहे. त्यात वरीष्ठ वकील रमेश गुप्ता यांनी मिश्राची बाजू न्यायालयात मांडली. ते म्हणाले, लघुशंका थांबवता न येण्याचा ज्येष्ठ महिलेला त्रास असावा. कथक करणाऱ्या महिलांना हा त्रास असतो. त्यामुळे ज्येष्ठ महिलेनेच विमानात लघुशंका केली असावी.किंवा लघुशंका करणारा दुसरा कोणी तरी असू शकतो.

नवी दिल्लीः मी ज्येष्ठ महिलेवर लघुशंका केलेली नाही. महिलेला शारीरिक त्रास आहे. तिनेच लघुशंका केली असावी, असा दावा विमान प्रवासात ज्येष्ठ महिलेवर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्राने दिल्ली न्यायालयात शुक्रवारी केला.
चौकशीसाठी मिश्राची पोलीस कोठडी मिळावी यासाठी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला आहे. त्यात वरीष्ठ वकील रमेश गुप्ता यांनी मिश्राची बाजू मांडली. ते म्हणाले, लघुशंका थांबवता न येण्याचा ज्येष्ठ महिलेला त्रास असावा. कथक करणाऱ्या महिलांना हा त्रास असतो. त्यामुळे ज्येष्ठ महिलेनेच विमान प्रवासात लघुशंका केली असावी किंवा लघुशंका करणारा दुसरा कोणी तरी असू शकतो. मिश्राने हे कृत्य केलेले नाही.
विमान प्रवासात ज्येष्ठ महिला बसली होती तेथे जाणे कठीण होते. त्यामुळेच शर्माने ज्येष्ठ महिलेच्या जवळ जाऊन लघुशंका केली असे म्हणणे चुकीचेच ठरेल. घटना घडली तेव्हा ज्येष्ठ महिलेच्या मागे बसलेल्या प्रवाशाने याविषयी कोणतीही तक्रार केलेली नाही, असा दावा adv गुप्ता यांनी केला. यावर न्यायालय संतप्त झाले. विमान प्रवासात कोणत्या आसना जवळ कोणीही कसाही जाऊ शकतो. ज्येष्ठ महिलेच्या आसना जवळ जात येत नव्हते असा खोटा दावा करु नका, असे न्यायालयाने बजावले.
पोलीस व प्रसार माध्यमांनी याप्रकरणाचा खेळ केला आहे. तक्रारदार महिलेने नुकसान भरपाई मागितली तेथेच हे प्रकरण संपले होते. तरीही हे प्रकरण मोठे करण्यात आले. हे प्रकरण इतके महत्त्वाचे आहे का?, मिश्राने खून केला आहे का? मिश्राला फरार घोषित करण्यात आले. त्याला अटक करण्यात आली. मिश्रा नोकरी गेली, हे सर्व योग्य आहे का, असा सवाल adv गुप्ता यांनी केला.

२६ नोव्हेंबर २०२२ रोजी ही घटना घडली. एअर इंडियाच्या विमानातील बिझनेस क्लासमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने महिलेवर लघुशंका केली. ७० वर्षीय पीडित महिलेने त्या व्यक्तिविरोधात टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पत्र लिहिले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरु झाली. शर्माचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकही स्थापन करण्यात आले.

पीडित महिला एअर इंडियाच्या फ्लाइट AI-102 ने न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी विमानतळावरून दिल्लीला जात होती. घडलेल्या विचित्र घटनेचा तपशील महिलेने पत्रात नमूद केला. दुपारच्या जेवणानंतर विमानातील लाइट्स बंद करण्यात आले. त्याचवेळी एक मद्यधुंद प्रवासी सीटजवळ आला आणि त्याने माझ्या अंगावर लघुशंका केली. त्यानंतरही तो प्रवासी माझ्या जवळच उभा राहिला. त्यावेळी सहप्रवाशाने समज दिल्यानंतर तो तेथून गेला. परंतु, लघुशंकेमुळे कपडे, बॅग, शूज पूर्णपणे भिजले होते. लघुशंका करणाऱ्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर ती व्यक्ती निघून गेली, असे पीडित महिलेने पत्रात नमूद केले. त्यानंतर मिश्राला अटक करण्यात आली. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. चौकशीसाठी त्याचा कोठडी मिळावी, अशी मागणी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात केली आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -