घरदेश-विदेशआता रस्त्यांवरून स्पीड ब्रेकर होणार गायब!

आता रस्त्यांवरून स्पीड ब्रेकर होणार गायब!

Subscribe

फास्टॅगच्या अंमलबजावणीनंतर आता सर्व राष्ट्रीय महामार्गांवरचे स्पीडब्रेकर काढून टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

स्पीडब्रेकर अर्थात गतीरोधकांचा मूळ उद्देश हा वेगाने जाणाऱ्या वाहनांचा वेग कमी व्हावा आणि त्याद्वारे अपघाताची शक्यता देखील कमी व्हावी असा आहे. मात्र, अनेकदा रस्त्यांवर इतके आणि इतक्या उंचीचे स्पीडब्रेकर असतात, की त्यांच्यामुळेच अपघात होईल की काय? अशी भिती वाटू लागते. महामार्गावर तर वेगाने येणाऱ्या वाहनांना मध्येच येणाऱ्या स्पीडब्रेकरचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र, आता या स्पीडब्रेकरच्या भितीपासून वाहनचालकांची सुटका होणार आहे. देशातल्या सर्व महामार्गांवरचे स्पीडब्रेकर हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. विशेषत: टोलनाक्यांजवळचे स्पीडब्रेकर हटवण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांसाठी ही आनंदाची बातमीच म्हणता येईल.

फास्टॅगनंतर स्पीडब्रेकरपासून सुटका!

नुकतंच रस्ते व वाहतूक विभागानं देशात फास्टॅग प्रणाली लागू केली. यामध्ये टोलनाक्यांजवळ टोल भरण्यासाठी वाहनांना थांबावं लागत होतं. मात्र, फास्टॅगमुळे टोलनाक्यावर वाहनांना थांबण्याची आवश्यकता उरली नाही. त्या पार्श्वभूमीवर महामार्गांवरचे स्पीडब्रेकर देखील हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अडथळ्यांविना प्रवास करणं वाहनांना शक्य होणार आहे.

- Advertisement -

इंधन बचत होणार!

दरम्यान, या निर्णयामुळे वाहनं थांबत थांबत चालल्यामुळे होणारा इंथनाचा अपव्यय टाळता येईल, असा अंदाज आहे. तसेच, वेळेची देखील बचत होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाहनचालकांना विनात्रास प्रवास करणं शक्य होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -