घरताज्या घडामोडीखुशखबर! आता Amzone करणार घरपोच मद्याची डिलिव्हरी

खुशखबर! आता Amzone करणार घरपोच मद्याची डिलिव्हरी

Subscribe

लॉकडाऊनमुळे दारू उद्योगाला मोठा फटका बसला. बर्यारच राज्यांत महसूल जमा कमी झाला. त्यानंतर लॉकडाऊन ३ मध्ये दारूच्या दुकानांना परवानगी देण्यात आली. मात्र दारूच्या दुकानांमध्ये होणारी गर्दी बघता. दुकानं बंद करून ऑनलाईन दारू विक्रीला सुरूवात झाली. आता अॅमेझॉनने देखील ऑनलाईन दारू विक्रीला सुरूवात केली आहे. त्यामुळे तुम्ही अॅमेझॉनवरून वाईन ऑर्डर करू शकता.

अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनला भारतात मद्यविकण्याची परवानगी देण्यात आली आहे. असा विश्वास आहे की यामुळे देशातील कोट्यावधी कोटींच्या मद्य उद्योगास चालना मिळेल. अॅमेझॉन प्रमाणेच अलिबाबाच्या ग्रोसरी उपक्रमाच्या बिगबास्केटलाही दारूला परवानगी देण्यात आली आहे. या दोन्ही कंपन्या पश्चिम बंगालमधील दारूची होम डिलेव्हरी करतील.

- Advertisement -

रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, अॅरमेझॉनने आपल्या वतीने अद्याप कोणतेच निवेदन आलेलं नाही पण अॅेमेझॉन कंपनीने पश्चिम बंगालमधील २.६ लाख कोटींच्या दारू उद्योगात सामील व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. गेल्या महिन्यातच स्विगी आणि झोमाटोसारख्या अन्न वितरण कंपन्यांनी देशातील काही शहरांमध्ये दारूची विक्री सुरू केली आहे. दारूची मोठ्या प्रमाणात मागणी लक्षात घेता या कंपन्यांनी हा निर्णय घेतला होता. देशातील प्रत्येक राज्यामध्ये मद्यासंदर्भात भिन्न धोरण आहे. पश्चिम बंगाल सरकारने गेल्या महिन्यात ऑनलाइन दारू वितरणाची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर अॅमेझॉन आणि बिग बास्केटने ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -