घरदेश-विदेशभारतात आयात होणाऱ्या कोरोना लसीच्या कच्चा मालावर अमेरिकेचे निर्बंध

भारतात आयात होणाऱ्या कोरोना लसीच्या कच्चा मालावर अमेरिकेचे निर्बंध

Subscribe

भारतात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णसंख्येने १ कोटीचा आकडा पार केला आहे. याचदरम्यान देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला वेगाने सुरुवात झाली आहे. मात्र मोहिमेत आता मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकन सरकराने भारतात आयात होणाऱ्या कोरोना लसीच्या कच्चा मालावर निर्बंध लादले आहेत. कारण अमेरिकन सरकारने देशातील नागरिकांना सर्वप्रथम लस उपलब्ध करून देण्याचे कर्तव्य समजत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी हा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेतील प्रत्येक व्यक्तीला कोरोना लस उपलब्ध करून देणे हे अमेरिकन सरकारचे प्राधान्य आहे. त्यामुळे अमेरिकेत ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण बायडेन सरकार राबत आहे. तसेच जगभरातील उत्तरदायित्व राबवण्यासाठी अमेरिकन सरकार शक्य तेवढे प्रयत्न करेल असे अमेरिकन प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

अमेरिकेत जगाच्या तुलनेत कोरोना संसर्ग वेगाने होत आहे. त्यामुळे अमेरिकेला मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेत आत्तापर्यंत साडे पाच लाखहून नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या प्रशासानाने हा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेवरही मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण भारतात कोरोना रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत असून रुग्णांचा आकडा साडे तीन लाखांवर पोहचला आहे. त्यामुळे भारतासमोर कोरोना विषाणूने मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे अमेरिकेने लसीच्या कच्चा मालाच्या निर्यावरील निर्बंध तात्काश उठवावे अशी मागणी भारताकडून केली जात आहे. यापूर्वी सीरम इस्टिट्यूडचे सीईओ अदर पुनावाला यांनी कोरोना लसीच्या कच्चा मालाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवावे अशी मागणी अमेरिकन सरकारकडे केली आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींनी, केजरीवाल यांना फटकारले


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -