घरCORONA UPDATEअम्फान मदतकार्यानंतर एनडीआरएफचे ५० जवान कोरोना पॉझिटिव्ह

अम्फान मदतकार्यानंतर एनडीआरएफचे ५० जवान कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

एनडीआरएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी माहिती दिली.

देशातील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. सुरक्षा दलांमध्येही हा विषाणू वेगाने पसरत आहे. एनडीआरएफच्या जवानांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. ओडिशामध्ये ५० एनडीआरएफ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं आहे. याबाबतची माहिती एनडीआरएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

- Advertisement -

ओडिशामध्ये नुकतंच अम्फान चक्रिवादळ येऊन गेलं. या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफला तैनात करण्यात आलं होतं. मदतकार्यानंतर परत आलेल्या एनडीआरएफच्या जवानांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. त्यानंतर १९० जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. यामध्ये ५० जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं.


हेही वाचा – शाळा सुरु करण्याचा निर्णय १५ जुलै नंतर

- Advertisement -

यासह, पश्चिम बंगालहून परत आलेल्या ५० एनडीआरएफ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं आहे. हे सर्व जवान पश्चिम बंगालमध्ये अम्फान चक्रिवादळानंतर मदतकार्यासाठी गेलेल्या संघाचा एक भाग आहेत. मदतकार्यानंतर ओडिशाच्या कटकमधील मुंडलीला परत आलेल्या एनडीआरएफच्या १७७ जवानांना अलग ठेवण्यात आलं. सर्व कोरोना पॉझिटिव्ह जवान एनडीआरएफच्या तिसर्‍या बटालियनमधील असल्याचं सांगितलं जात आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -