घरताज्या घडामोडीमंकीपॉक्सनंतर मुंबई, ठाण्यात Hand Foot Mouth Disease चा संसर्ग

मंकीपॉक्सनंतर मुंबई, ठाण्यात Hand Foot Mouth Disease चा संसर्ग

Subscribe

दिल्लीसह महाराष्ट्रात मंकीपॉक्सनंतर आता लहान मुलांच्या हात-पाय-तोंडाला होणाऱ्या विषाणुजन्य संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लहान मुलांना शरीरावर फोड येत असल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदवले आहे. हात-पाय-तोंड हा विषाणूजन्य आजार लहान मुलांमध्ये जास्त काळ राहत नाही. ताप ३-४ दिवसातच कमी होतो. दुसरीकडे, मंकीपॉक्स हा आजार २ ते ४ आठवड्यापर्यंत राहतो.

मागील दहा वर्षांपासून हा आजार लहान मुलांमध्ये दर पावसाळ्यात होत असल्याचं निरीक्षण बालरोग तज्ज्ञांचं नोंदवलं आहे. पावसाळ्यातील सप्टेंबर महिन्यात या आजाराचे रुग्ण वाढतात, मात्र जुलैपासूनच आजाराची लक्षणे डोके वर काढू लागली आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना अशा प्रकारचे आजार होतात. लहान मुलांसाठी व्हायरस नवीन असतो. हॅण्ड-फूट-माऊथमध्ये मुलं चिडचिडी होतात. तसेच अशक्तपणा येतो आणि तोंडात फोड आल्याने जेवण जात नाही. परिणामी योग्य उपचार घेणं गरजेचे आहे.

देशात आतापर्यंत ९ जणांना मंकीपॉक्स विषाणूची लागण झालेली आहे. यामध्ये राजधानी दिल्लीमध्ये आतापर्यंत चार रुग्ण आढळले आहेत. तर पाच रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. याशिवाय, सरकारने आता नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, केंद्र सरकारने विविध लस निर्मिती कंपन्यांना मंकीपॉक्स विरोधी लस तयार करण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : दिल्लीमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत भर; देशभरातील संख्या ९


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -