घरताज्या घडामोडीदिल्लीमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत भर; देशभरातील संख्या ९ वर

दिल्लीमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत भर; देशभरातील संख्या ९ वर

Subscribe

कोरोनानंतर देशभरात मंकीपॉक्सचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राजधानी दिल्लीत एका 31 वर्षीय महिलेला मंकीपॉक्स विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोनानंतर देशभरात मंकीपॉक्सचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राजधानी दिल्लीत एका 31 वर्षीय महिलेला मंकीपॉक्स विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीमधील हा मंकीपॉक्सचा चौथा रुग्ण आहे. एका रुग्णाची वाढ झाल्याने देशात मंकिपॉक्सच्या एकूण रुग्णांची संख्या नऊवर पोहचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला नायझेरिया येथील असून, महिलेला लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या महिलेला ताप आणि हातावर पुरळ आहेत. ३१ वर्षीय महिलेचे नमुणे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. बुधवारी रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत.

- Advertisement -

९ जणांना मंकीपॉक्सची लागण

देशात आतापर्यंत ९ जणांना मंकीपॉक्सची लागण झालेली आहे. यामध्ये राजधानी दिल्लीमध्ये आतापर्यंत ४ रुग्ण आढळले आहेत. तर पाच रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. केरळमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मंकीपॉक्सचा संसर्ग आणि परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने टास्क फोर्सची स्थापना केली आहे.

- Advertisement -

याशिवाय, सरकारने आता नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, केंद्र सरकारने विविध लस निर्मिती कंपन्यांना मंकीपॉक्स विरोधी लस तयार करण्याचे आवाहन केले आहे.

मंकीपॉक्सची लक्षणं काय?

  • ‘मंकीपॉक्स’ हा एक दुर्मिळ विषाणू आहे.
  • ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत.
  • संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते.
  • ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.

हेही वाचा – 10 जनपथ आणि काँग्रेस कार्यालयाबाहेर पोलीस तैनात, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची भीती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -