अरे व्वा! प्राण्यांचंही कोरोनापासून संरक्षण होणार, देशातील पहिली लस लॉन्च

आयसीएआर-नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्विन्सने (National Research Centre on Equines) ही लस विकसित केली असून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Sing Tomar) यांनी गुरुवारी ही लस लॉन्च केली.

vaccine for animals

प्राणीप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्राण्यांपासून कोरोनाचा बचाव करण्यासाठी ‘अ‍ॅनोकोव्हॅक्स’ (Enokovax) नावाची लस उत्पादित करण्यात आली आहे. ही लस आयसीएआर-नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्विन्सने (National Research Centre on Equines) विकसित केली असून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Sing Tomar) यांनी गुरुवारी ही लस लॉन्च केली. प्राण्यांसाठी विकसीत केलेली ही देशातील पहिली अँटी-कोविड लस आहे. (Anocovax: India’s homegrown Covid-19 vaccine for animals)

हेही वाचा – ‘हर घर दस्तक’ मोहिमेद्वारे गतिमान लसीकरण, १२ ते १७ वयोगटातील मुलांचे लसीकरण

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर अनेक प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. मात्र, प्राण्यांसाठी प्रतिबंधक लस तयार झाली नव्हती. त्यामुळे अनेक प्राणीप्रेमी प्राण्यांना उपयुक्त ठरणारी लस प्रतिक्षेत होती. त्यातच, आयसीएआर-नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्विन्सने ही लस उत्पादित केली. अ‍ॅनोकोव्हॅक्स प्राण्यांसाठी सार्स-कोव्ह-2 डेल्टा (SARS-CoV-2 Delta) ही लस आहे. सार्स कोव्हच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही प्रकारांपासून प्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी या लसीची निर्मिती करण्यात आली आहे. या लसीमध्ये निष्क्रिय सार्स कोव्ह 2 (डेल्टा) अँटिजेन आणि अलहायड्रोजेलचा (Alhydrogel) समावेश आहे. ही लस कुत्री, सिंह, बिबट्या, उंदीर आणि ससे यांच्यासाठी सुरक्षित आहे.

हेही वाचा – नाशिक जिल्ह्यात 100 टक्के कोरोना लसीकरण

या लसीचे उद्घाटन करताना तोमर म्हणाले की, “लस इतर देशातून आयात करण्यापेक्षा स्वदेशी लस विकसित करण्यात आपला देश स्वयंपूर्ण झाला आहे. हे खरोखरंच मोठं यश आहे.” आयसीएआर ही देशातील प्रमुख कृषी संशोधन संस्था आहे, जी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. यावेळी इक्वीन डीएन पॅरेंटेज टेस्टिंग किटदेखील केंद्रीय मंत्री तोमर यांनी लॉन्च केले.