घरदेश-विदेशबिहारमधील आयएएस अधिकाऱ्याचा मुजोरपणा; जनतेला दिल्या शिव्या

बिहारमधील आयएएस अधिकाऱ्याचा मुजोरपणा; जनतेला दिल्या शिव्या

Subscribe

बिहारमध्ये एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुजोर वागण्याने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. एका मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याची वागण्याची पद्धत अगदी खालच्या पातळीची असल्याचे एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. के. के. पाठक असे या अधिकाऱ्याचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे.

बिहार सरकारच्या दारूबंदी विभागाचे प्रधान सचिव असलेल्या के. के. पाठक यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये के. के. पाठक त्यांच्या विभागात बैठक घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी सगळे अधिकारी बसलेले असतात, पण तेव्हाच के. के. पाठक अचानक संतापतात. यावेळी ते बिहारच्या इतर अधिकाऱ्यांना शिवीगाळ करायला लागतात. इतकेच नाही तर ते बिहारच्या जनतेलासुद्धा नंतर शिवीगाळ करू लागतात.

यावेळी ते म्हणतात की, बिहारमधील लोक हे लाल सिग्नल असताना देखील हॉर्न वाजवत राहतात. यानंतरही ते अपशब्दांचा वापर करताना म्हणतात की, कधी चेन्नईच्या लोकांना तुम्ही सिग्नल लाल असताना हॉर्न वाजवताना पाहिले आहे का?, बिहारमधील लोकांना कोणतीही समज नाही. के. के. पाठक इतक्यावरच थांबत नाहीत तर ते एका उपजिल्हाधिकाऱ्याला देखील शिवीगाळ करत म्हणतात की, येथील अधिकारीही तसेच आहेत. के. के. पाठक एका अधिकाऱ्यावर आपला निशाणा साधत म्हणतात की, ‘मला लिहून दे.. मग मी बघतो.’ के. के. पाठक यांच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक अधिकारी त्यांची माफी मागताना दिसून येत आहे.

- Advertisement -

याबाबत एका प्रसार माध्यमाने के. के. पाठक यांच्याशी संपर्क साधला आणि घडलेल्या या प्रकरणाबाबत चौकशी केली असता ते म्हणाले की, अधिकाऱ्यांमध्ये काही समस्या आहेत. होय, मी त्या सभेत माझ्यावरील संयम गमावला, परंतु कोणाबद्दलही माझ्या मनात काहीही वाईट नाही.

के. के. पाठक यांची हकालपट्टी करण्याची मागणी
के. के. पाठक यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बिहार अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असोसिएशनचे (बासा) अध्यक्ष सुनील तिवारी यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलीय. सुनील तिवारी यांनी याबाबत बोलताना सांगितले आहे की, के. के. पाठक यांच्यावर सरकारने कारवाई करावी, त्यांना लवकरात लवकर बडतर्फ करण्यात यावे. दारूबंदी विभागाचे सचिव असण्यासोबतच ते विपार्डचेही प्रभारी असून, प्रशिक्षणादरम्यान ते बिहारच्या अधिकाऱ्यांना त्रास देतात. यादरम्यान एका अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. ते अत्यंत घाणेरडे बोलतात आणि मानसिक ताण देतात, असा मुद्दा आम्ही सातत्याने मांडत आहोत. या व्हिडीओमुळे आमचे सर्व अधिकारी संतापले आहेत. यावर आम्ही लवकरात लवकर कारवाई करणार आहोत. सध्या मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मुख्य सचिवांना त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे. अन्यथा बिहार प्रशासकीय सेवा संघाला याबाबत पुढील निर्णय घेण्यास भाग पाडले जाईल, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असेही सुनील तिवारी यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – राजकारणाची दिशा बदलतेय यावर सल्ला काय?, अशोक चव्हाणांनी रविशंकर यांना विचारला प्रश्न

गैरव्यवहाराला ना कायदा परवानगी देतो ना समाज : भाजप खासदार
याप्रकरणी भाजप खासदार सुशील कुमार सिंह म्हणाले की, ‘मला के. के. पाठकबद्दल जितके माहिती आहे, त्यानुसार ते एक प्रामाणिक अधिकारी आहेत. पण तुम्ही कोणाचा अपमान करणे किंवा कोणाला शिवीगाळ करणे हे देखील योग्य नाही. अधिकारी काम करत नसेल तर त्याच्यासाठी कायदा करण्यात आला आहे. त्याला कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते किंवा काम करण्यास सांगितले जाऊ शकते. परंतु कायदा किंवा समाज कोणालाही आपल्या आई-बहिणीवर अत्याचार करण्यास परवानगी देत ​​​​नाही. एवढ्या मोठ्या आणि जबाबदार पदावर असलेल्या लोकांनी शब्द कसे आणि का वापरायचे याचा विचार करायला हवा. कोणत्या परिस्थितीत कसे वागायला हवे हे कळले पाहिजे. एकंदरीत मी म्हणेन की असे कोणीही वागू नये.

के. के. पाठक यांची मानसिक चाचणी झाली पाहिजे : काँग्रेस
बिहार काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश प्रसाद सिंह हे याप्रकरणी बोलताना म्हणाले की, सरकारने त्यांची मानसिक चाचणी करावी. कोणत्याही जबाबदार पदावरील व्यक्ती असे वागू शकत नाही. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून कारवाई करावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -