घरताज्या घडामोडीपंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार आल्यावर ३०० यूनिट वीज मोफत, अरविंद केजरीवार...

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार आल्यावर ३०० यूनिट वीज मोफत, अरविंद केजरीवार यांचे आश्वासन

Subscribe

पंजाबमधील ८० टक्के जनतेचं वीज बिल हे शून्य रुपये येणार

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (आप) नेते अरविंद केजरीवार यांनी चंदीगडमध्ये पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वीजसंदर्भातील तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी पंजाबमध्ये आपचे सरकार आल्यानंतर राज्यातील सर्व नागरिकांचे ३०० यूनिटपर्यंत वीज बिल माफ करण्यात येईल. यामुळे पंजाबमधील ८० टक्के जनतेचं वीज बिल हे शून्य रुपये होईल. केजरीवार यांनी म्हटलं आहे की, देशात सर्व महाग वीजेचा दर हा पंजाबमध्ये आहे तसेच पंजाबमध्ये वीज निर्माण करण्यात येते परंतु दिल्लीत वीज निर्मिती होत नाही तरीही दिल्लीत वीज स्वस्त आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दुसरी घोषणा अशी केली आहे की, ज्या लोकांचे वीज बिल थकीत आहे अशा ग्राहकांना वीज बिलात सवलत देण्यात येऊन त्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल. तसेच तिसऱ्या घोषणामध्ये म्हटलंय की, राज्यात आपची सत्ता आल्यावर २४ तास वीज देण्यात येणार आहे. या घोषणा आणि आश्वासनांमुळे पंजाबमधील लोकांना खासकरुन महिलांना दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

वाढत्या वीज दरामुळे पंजाबमधील जनता त्रस्त आहे. आपकडून वारंवार पंजाबमधील वीजदर कमी करण्याची मागणी होत आहे. पंजाब राज्याला जेवढ्या विजेची गरज आहे त्याच्यापेक्षा अधिक वीज निर्मिती करण्यात ये आहे. वीज निर्मिती कंपनी आणि सरकारचे लागेबंध असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे. सरकारी कंपन्या आणि वीज निर्मिती कंपन्या यांच्यातील संबंध तोडले गेल्यास पंजाबमधील लोकांना वीजदराचा त्रास होणार नाही असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -