घरताज्या घडामोडीसेक्सच्या बदल्यात डिग्री; महिला प्रोफेसरला ११ महिन्यानंतर जामीन!

सेक्सच्या बदल्यात डिग्री; महिला प्रोफेसरला ११ महिन्यानंतर जामीन!

Subscribe

देवांग आर्ट्स कॉलेजच्या प्रोफेसर निर्मला देवी यांना गेल्यावर्षी १६ एप्रिलला अटक करण्यात आली होती.

तमिळनाडूमध्ये पकडल्या गेलेल्या सेक्स स्कॅण्डलमधील आरोपी महिला कॉलेजच्या प्रोफेसरला मद्रास हायकोर्टाने ११ महिन्यांनंतर जामीन दिला आहे. मदूराई येथील जस्टिन एन किरूबाकरण आणि एसएस सुंदर यांनी निलंबित असिस्टंट प्रोफेसर निर्मला देवी यांना जामीन दिला आहे. या प्रोफेसरवर आरोप होते की, ती विद्यार्थीनींना कामराज विद्यापिठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी शरीर संबंध ठेवल्यास चांगले मार्क आणि पैसे देण्याचे लालुच दाखवत होती.

सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले की, महिला प्रोफेसरला जामीन देण्यात कोणतीही अडचण नाहीये. फक्त या महिलेने पोलिसांना चौकशी दरम्यान संपूर्ण सहकार्य करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या महिलेला प्रसारमाध्यमांशी बोलता येणार नाही.

- Advertisement -

देवांग आर्ट्स कॉलेजच्या प्रोफेसर निर्मला देवी यांना गेल्यावर्षी १६ एप्रिलला अटक करण्यात आली होती. निर्मला देवी यांचा विद्यार्थीनींशी बोलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. या व्हिडिओमध्ये त्या विद्यार्थीनींना अधिकाऱ्यांशी जुळवून घेण्याविषयी सांगत होत्या.

या व्हिडिओची चौकशी करून कॉलेजने निर्मला देवी यांना निलंबीत केले. या घटनेची चौकशी सीआयडीकडे सोपवण्यात आली होती. निर्मला देवी यांच्या अटकेनंतर पोलीसांनी असिस्टंट प्रोफेसर वी मुरूगन आणि करूप्पासामी यांना देखील ताब्यात घेतले. हायकोर्टाने जामीन नाकारल्यानंतर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रिम कोर्टाने यांना जामीन मंजूर केला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – मद्यप्रेमींसाठी खुशखबर! ‘या’ राज्यात मिळणार आता घरपोच दारू!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -