घरताज्या घडामोडीमणिपूर: भारतीय लष्कराने चार दहशतवाद्यांचा केला खात्मा, अजूनही ऑपरेशन सुरू

मणिपूर: भारतीय लष्कराने चार दहशतवाद्यांचा केला खात्मा, अजूनही ऑपरेशन सुरू

Subscribe

मणिपूरच्या हिंगोरानीमध्ये संयुक्त कारवाई दरम्यान आसाम रायफल्स आणि भारतीय लष्कराच्या ३ कॉर्प्ससह सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांना ठार केले. या घटनेबाबत अधिक माहिती देताना मणिपूरच्या संरक्षण मंत्रालयाच्या पीआरओने सांगितले की, ‘काल, ऑपरेशन सुरू केले होते आणि आज सकाळी दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. अजूनही ऑपरेशन सुरू आहे. यादरम्यान झालेल्या चकमकीत ठार झालेली दहशतवादी कुकी समूहाचे होते.’

गेल्या आठवड्यात राष्ट्रीय तपास एजेंसी (एनआयए) बेकायदेशीर कुकी दहशतवादी समूह युकेएलएफच्या स्वयंघोषित अध्यक्षला हत्यारांची तस्करी आणि देशाविरोधात बेकायदेशीर कारवाया केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. युनायटेड कुकी लिबरेशन फ्रंट (युकेएलफ)चे स्वयंघोषित अध्यक्ष लुंखोसन हाओकिप फरार झाला होता.

- Advertisement -

माहितीनुसार, गेल्या दिवसात मणिपूर पोलिसांनी बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना पीपुल्स रिव्होल्यूनरी पार्टी ऑफ कंगलीपाक प्रोग्रेसिव्हच्या (Prepak-Progressive) एका सक्रिय कॅडरला इम्फाल पश्चिम जिल्ह्यातून अटक केले होते. त्याच्याकडून मोठ्याप्रमाणात आयईडी स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले होते. इम्फाल पश्चिमचे पोलीस अधीक्षक एस इबोम्चा सिंह यांनी सांगितले की, ‘पोलिसांनी जिल्ह्याच्या लम्फेल पोलीस स्टेशन परिसरातील लैरिक्येंगबाम माखा लेइकाई भागातून दहशतवाद्यांना अटक केले होते. यांच्याकडून देखील पोलिसांनी आयईडी साहित्य जप्त केले होते. ज्यामध्ये माशांच्या डब्यात आयईडीचा एक सेट, एक एअरगन रायफल, चार पीईके केक, तीन इलेक्ट्रॉनिक सर्किटस, एक रिमोट कंट्रोल डिव्हाईस, तीन डेटोनेटर सामील होते.’

- Advertisement -

हेही वाचा – Russian plane crashes : रशियामध्ये भीषण विमान अपघात, १६ जणांचा मृत्यू, ७ गंभीर जखमी


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -