Russian plane crashes : रशियामध्ये भीषण विमान अपघात, १६ जणांचा मृत्यू, ७ गंभीर जखमी

russian plane crashes in region of tatarstan killing 16 people and 7 injuring
Russian plane crashes : रशियामध्ये भीषण विमान अपघात, १६ जणांचा मृत्यू, ७ गंभीर जखमी

रशियातील तातरस्तान शहरात एल ४१० टर्बोलेट विमानाचा भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला आहे तर ७ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तातरस्तान इथं मॉस्कोतील प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या विमानातून एकूण २३ प्रवासी प्रवास करत होते. मात्र तातरस्तानमधील मेन्झेलिन्स्क शहरात हे विमान क्रॅश झाल्याचे वृत्त TASS या रशियन वृत्तसंस्थेनं दिलं आहे. हा विमान अपघात इतका भीषण होता की, विमानाचे चक्क दोन तुकडे झाले आहेत.

आपत्कालीन मंत्रालयाने सांगितले की, पॅराशूटने जंप करणारा एक समुह विमानातून प्रवास करत होता. यावेळी अपघातग्रस्त विमानातून सात जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. दोन इंजिन असणारे शॉर्ट-रेंज ट्रांसपोर्ट असणारे हे एल -410 टर्बोलेट असं हे एअरक्राफ्ट होते.

अलिकडेच रशियन विमान सुरक्षा मानकांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. परंतु दुर्गम भागात जुन्या विमानांमुळे अपघात होत आहेत. यापूर्वी गेल्या महिन्यात रशियाच्या सुदूर पूर्वेमध्ये एक जुना एंटोनोव्ह एन -26 एंटोनोव्ह विमान कोसळले दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर जुलैमध्ये कामचटका येथे एका विमान अपघातात एकूण २८ प्रवासीठार झाले होते.