घरताज्या घडामोडीCoronaVirus Vaccine: ऑक्सफर्डच्या लसीला ब्रिटनमध्ये परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

CoronaVirus Vaccine: ऑक्सफर्डच्या लसीला ब्रिटनमध्ये परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

Subscribe

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रिटन सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकाराने ब्रिटन सावरत नाही तोच त्याहून अधिक संसर्गजन्य आणखी एक कोरोना व्हायरस आढळून आला आहे. यामुळे ब्रिटन हादरलं आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन ७० टक्के अधिक वेगाने पसरत असल्याने सर्वच देशांनी सावध पवित्रा घेतला आहे. भारतासह सुरोपमधील जवळपास सर्वच देशांनी ब्रिटनसोबत सुरु असलेलेली हवाई वाहतूकही रोखली आहे. त्यातच आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रिटन सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

सरकारने घेतला मोठा निर्णय

ब्रिटनमधील नियामक संस्था मेडिसीन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीन (एमएचआरए) ऑक्सफर्ड (Oxford) Astra Zeneca लसीच्या वापरास परवानगी दिली आहे. भारतात ऑक्सफर्ड Astra झेनेकाच्या लसीची चाचणी सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियानं केली आहे. ब्रिटनच्या नियामक यंत्रणेकडून ऑक्सफर्ड Astra झेनेकाच्या लसीला परवानगी मिळाल्यानंतर भारतात या लसीच्या वापरास मंजुरी देण्याचा विचार मोदी सरकारकडून सुरु आहे. आता ब्रिटनने ऑक्सफर्ड Astra झेनेकाच्या लसीच्या वापरास परवानगी दिल्यानंतर केंद्र सरकारदेखील लसीच्या वापरास मंजुरी देऊ शकतं.

कोरोनावरील लस वितरण सुरु

कोरोनावरील लसीच्या डोजेसचं वितरण सुरु झालं आहे. यामुळे नव्या वर्षाला सुरुवात होताच लसीकरणास प्रारंभ करता येईल, अशी माहिती Astra झेनेकानं मंजुरीनंतर दिली आहे. विशेष म्हणजे पहिल्या तीन महिन्यांत ब्रिटन सरकारला लसींचे १०० मिलियन डोस पुरवण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे.

- Advertisement -

आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. ब्रिटनच्या लाखो नागरिकांसाठी हा दिवस खूपच खास आहे. कारण त्यांना लवकरात लवकर लस दिली जाणार आहे. या महत्त्वाच्या दिवशी आम्ही ऑक्सफर्ड विद्यापीठ, ब्रिटन सरकार आणि लसीच्या चाचण्यांमध्ये सहभागी असलेल्या स्वयंसेवकांचे आभार मानतो.  – पास्कल सोरियट; झेनेकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी


हेही वाचा – Corona Vaccine: फायझरची लस घेतलेल्या अमेरिकेच्या आरोग्यसेवकाला कोरोनाची लागण


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -