घरमुंबईसायरस पुनावाला यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या - बाळा नांदगावकर

सायरस पुनावाला यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या – बाळा नांदगावकर

Subscribe

देशात भूषणावह कार्य करणाऱ्या सायरस पुनावाला यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते बाळासाहेब नांदगावकर यांनी केली आहे.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनावर लस तयार करण्यासाठी संपूर्ण जगात संशोधन सुरू आहे. भारतातील सीरम इन्सिटट्यूट ही गेली अनेक वर्षे भारतात अनेक रोगांवर लस तयार करण्याचे काम करत आहे. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया इंडियाचे पुनावाल यांनी सोमवारी कोरोना लस कोविशील्डचे ४ ते ५ करोड डोस भारतात दिले जाणार आहेत. देशात भूषणावह कार्य करणाऱ्या सायरस पुनावाला यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते बाळासाहेब नांदगावकर यांनी केली आहे.

- Advertisement -

‘सायरस पुनावाला हे सिरम इस्टिट्यूटच्या माध्यमातून गेली अनेक दशके विविध रोगांवर लस उपलब्ध करून देत आहेत. कोरोना महामारीत सुद्धा संपूर्ण जगाला त्यांनी लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करून मोठा दिलासा दिला आहे. पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उंचावणारे आहे. आपल्या भूषणावह कार्य करणाऱ्या सायरस पुनावाला यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे ,अशी विनंती बाळा नांदगावकर यांनी यांनी केली आहे. यासंबंधिचे ट्विट त्यांनी केले आहे.

भारतात सीरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीची निर्मिती करत आहे. सीरम इस्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना लसीसाठी एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्ड युनिव्हरसिटीसोबत भागीदारी केली आहे. जानेवारी माहिन्यात भारतात कोरोना लसीचे लसीकरण सुरु होऊ शकते, असे पुनावाला यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते. भारतात कोरोना लस बनवणाऱ्या कंपन्यामधील सीरम ही कंपनी सर्वात पुढे आहे. तर कोरोनावर लस तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये बायोटेक ही कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus Vaccine: ऑक्सफर्डच्या लसीला ब्रिटनमध्ये परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -