घरदेश-विदेशदिवसातील अवघ्या ७ रुपयांची बचत दर महिना मिळवून देईल ५००० रुपयांचे उत्पन्न,...

दिवसातील अवघ्या ७ रुपयांची बचत दर महिना मिळवून देईल ५००० रुपयांचे उत्पन्न, जाणून घ्या

Subscribe

देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनदरम्यान अनेकांची पगार कपात झाली तर बहुतेक कामगार बेरोजगार झाले. अशावेळी आर्थिक खर्च कसा भागवायचा असा प्रश्न अनेक गरीब कुटुंबांसमोर निर्माण झाला आहे. यात केंद्र सरकारची अटल पेंशन योजना अनेकांसाठी आधार ठरत आहे. ही योजना विशेषतः असंघटीत क्षेत्रातील कर्मचऱ्यांसाठी आहे.

दर महिना कमवा ५००० रुपये

असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा उत्पन्नाचा विचार करत ही योजना सुरु करण्यात आली आहे. यात ६० वर्षावरील असंघटीत कामगार वर्षाचा खर्च कसा भागवेल या दृष्टीने योजन आखण्यात आली आहे. जे असंघटीत कामगार आयकरच्या बाहेर आहेत, तेच कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. व १००० रुपयांपासून ते ५००० रुपयांपर्यंत पेंशन मिळू शकतात. या योजनेत वयानुसार गुंतवणूक रक्कम वेगवेगळी आहे. जेवढ्या लवकर तुम्ही या योजनेत पैसे गुंतवणार तेवढ्या लवकर तुम्हाला कमी रक्कम दर महिना भरावी लागेल.

- Advertisement -

प्रति दिवसाप्रमाणे तुम्हाला दरमहिना २१० रुपये जमा करावे लागतील

या योजनेतून दरमहा ५००० रुपयांच्या पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला दरमहा २१० रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच ७ रुपये प्रतिदिवसाप्रमाणे तुम्हाला दरमहिना २१० रुपये जमा करावे लागतील. जर तुम्ही ३९ वर्षाचे आहात तर तुम्हाला १३१८ रुपये प्रतिमहिना योजनेत जमा करावे लागतील. अटल पेंशन योजना सुरू असलेल्या व्यक्तीचे निधन झाल्यास कुटूंबाला योजनेचा फायदा सुरू राहिल. व्यक्तीच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतरही मुलांना या पेंन्शनचा लाभ घेता येईल.

या योजनेतील सर्व सुविधा आणि फायद्यांची जबाबदारी भारत सरकार घेते. या योजनेचं संचालन PFRDA ही रेग्युलेटरी बॉडी मार्फत केले जाते. १८ ते ४० वयोगटातील सर्व नागरिकांसाठी ही योजना लाभदायी ठरत आहे. कमीत कमी २० वर्षांपर्यंत या योजनेत गुंतवणूक करणे गरजेचे असून यासाठी तुमचे स्वत:चे बँक अकाउंट असणे गरजेचे आहे. खासगी बँकेतही तुम्ही अटल पेंशन योजनेचे खाते सुरु करु शकता.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -