घरताज्या घडामोडीवर्ध्यात कंपनीत रेमडेसिवीरचा पहिला साठा तयार, गडकरींनी वितरणाबाबत केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

वर्ध्यात कंपनीत रेमडेसिवीरचा पहिला साठा तयार, गडकरींनी वितरणाबाबत केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Subscribe

वर्धा जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीत तयार झालेले १७ हजार रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा पहिला स्टॉक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आला आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे रुग्णांना मोठ्या लवकर बरे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासत आहे. दिवसाला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज राज्याला लागत आहे. वाढत्या रेमडेसिवीरच्या मागणीमुळे नफेखोर आणि कालळाबाजार करणाऱ्यांनी फायदा उचलला होता. राज्यातील अनेक जिल्ह्यात ४० ते ५० हजार रुपयांनी रेमडेसिवीर इंजेक्शन विकले जात होते. या सर्व गोष्टींना चपराक बसण्यासाठी आणि राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन राज्यात उत्पादन करण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीत रेमडेसिवीर इंजेक्शन निर्मिती करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाठपुरावा केला होता. गडकरींच्या पाठपुराव्याला यश आले असून या कंपनीत ५ मे रोजी इंजेक्शनचे उत्पादनाला सुरुवात करण्यात आली होती यामध्ये १७ हजार इंजेक्शन तयार झाली आहेत.

राज्यात वितरित करण्यासाठी जनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीतून रेमडेसिवीर इंजेक्शनचा पहिला स्टॉक तयार झाला आहे. यामध्ये एकुण १७ हजार इंजेक्शनच्या कुप्या तयार करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितल्यानुसार हे इंजेक्शन केवळ सरकारद्वारे वितरित करण्यात येणार आहेत. तर सामान्य नागरिकांना सरकारी दराने विकण्यात येणार आहेत.

- Advertisement -

वर्धा जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीत तयार झालेले १७ हजार रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा पहिला स्टॉक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आला असून आता नागपूर आणि महाराष्ट्रात वितरित करण्यात येणार आहे. गडकरींनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी फोनवर संवाद साधून रेमडेसिवीरचा साठा तयार झाला असून गरजेनुसार वाटप करण्याचे सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत रेमडेसिवीरच्या वितरणाबाबत चर्चाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -