घरदेश-विदेशBengal Assembly Election 2021: पत्रकारांच्या वाहनावर हल्ला, महिला पत्रकार जखमी

Bengal Assembly Election 2021: पत्रकारांच्या वाहनावर हल्ला, महिला पत्रकार जखमी

Subscribe

पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील गुरूवारी मतदान होत असून ३० जागांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. विधानसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात ३० जागांवर ३४५ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. मात्र या पश्चिमबंगाल विधानसभा निवडणुकादरम्यान पार पडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पश्चिम बंगाल येथील मोदिनीपूरमध्ये या भागात घडली आहे. गुरूवारी मोदिनीपूर जिल्ह्यातील केशपूर या ठिकाणी एका अज्ञात समुहाने माध्यमांच्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर हल्ला केला. कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर अज्ञांकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

असा आहे व्हायरल होणारा व्हिडिओ

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अज्ञात समुहातील काही पुरूष माध्यमाच्या कर्मचाऱ्यांच्या वाहनाचा पाठलाग करताना दिसताय. यासोबतच त्यांच्या वाहनावर जोरदार हल्ला करतानाही दिसताय. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक महिला पत्रकार त्यांच्या वाहनाला जाऊ देण्यासाठी एका माणसाकडे विनंती करताना दिसतेय.

- Advertisement -

असा घडला प्रकार

पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील केशपूर या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या काही पत्रकारांवर हल्ला आल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. काही स्थानिक वृत्तवाहिन्यांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. पश्चिम बंगालमध्ये आज गुरूवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. बंगालमधील गुरूवारी झालेल्या ३० मतदारसंघांपैकी केशपूर हा एक मतदारसंघ आहे. माध्यम संस्थेने असाही दावा केला की, या करण्यात आलेल्या हल्ल्यात एक महिला पत्रकारदेखील गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सुरू झाले असून बंगालमध्ये ३० जागी तर आसाममध्ये ३९ जागांवर हे मतदान पार पडणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केशपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार तन्मय घोष यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. ही घटना घडल्यानंतर काही वेळानेच ही घटना घडली. या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. यासह केशपुरात भाजप नेते प्रितीश रंजन कुवार यांच्या ताफ्यावरही दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच केंद्रीय दलाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. तर निवडणूक आयोगाने देखील प्रशासनाकडे या घटनेचा अहवाल मागितला आहे.

- Advertisement -

यासोबतच पश्चिम बंगालचे भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्याही गाडीच्या ताफ्यावर नंदीग्राममध्ये हल्ला करण्यात आला आहे.  या हल्ल्यात सुवेंदू अधिकारी यांच्या गाडीचे नुकसान झाले नाही, मात्र त्यांच्या ताफ्यातील इतर काही वाहनांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बंगालचे माजी मंत्रीदेखील जखमी झाले आहेत.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -