घरदेश-विदेशPM Modi Cabinet Expansion: नव्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय ६१ वरून ५८ वर्षांपर्यंत...

PM Modi Cabinet Expansion: नव्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय ६१ वरून ५८ वर्षांपर्यंत केले कमी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमडळाचा विस्तार होण्यापूर्वीच केंद्र सरकारने मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या 43 नेत्यांची यादी जाहीर केली. केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदल आणि विस्तारानंतर नव्या मंत्रिमडळाचे सरासरी वय 61 वर्षांवरून 58 वर्षांपर्यंत कमी करण्यात आले आहे. या मंत्रिमंडळातील निशिथ पारामाणिक (35 वर्षे) हे सर्वात तरुण मंत्री आहेत. ते पश्चिम बंगालच्या कूचबिहारचे खासदार आहेत. यातील सर्वात जुने सदस्य सोम प्रकाश असून त्यांचे वय 72 वर्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील नवीन मंत्रिमंडळात 77 सदस्य आहेत. 50 वर्षांखालील इतर मंत्र्यांमध्ये स्मृती इराणी (45 वर्षे), किरेन रिजिजू (49 वर्षे), मनसुख मंडावीया (49 वर्षे), कैलास चौधरी (47 वर्षे), संजीव बालियान (49 वर्षे), अनुराग ठाकूर (46 वर्षे), डॉ भारती प्रवीण पवार (42 वर्षे), अनुप्रिया सिंह पटेल (40 वर्षे), शांतनु ठाकूर (38 वर्षे), जान बारला (45 वर्षे) आणि डॉ. एल. मुरुगन (44 वर्षे) यांचा सहभाग आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज शपथ घेतलेल्या 43 मंत्र्यांचे सरासरी वय 56 वर्षे आहे, परंतु नवीन मंत्रिमंडळाचे सरासरी वय 58 वर्षे आहे. फेरबदल व विस्तार करण्यापूर्वी मंत्रिमंडळाचे सरासरी वय 61 वर्षे होते. केंद्रीय मंत्रिमंडळात बुधवारी झालेल्या महत्त्वपूर्ण फेरबदल व विस्तारात 43 मंत्र्यांनी शपथ घेतली. यापूर्वी डॉ. हर्षवर्धन, रमेश पोखरियाल निशंक, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता.

- Advertisement -

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी या मंत्र्यांची गच्छंती

१) सदानंद गौडा

२) रवि शंकर प्रसाद

- Advertisement -

३) थावर चंद गेहलोत

४) रमेश पोखरियाल निशंक

५) हर्ष वर्धन

६) प्रकाश जावडेकर

७) संतोष गंगवार

८) बाबूल सुप्रियो

९) संजय धोत्रे

१०) रत्तन लाल कटारिया

११) प्रताप चंद्र सारंगी

१२) सुश्री देबश्री चौधरी

माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते सर्बानंद सोनोवाल यांच्या व्यतिरिक्त, ज्योतिरादित्य सिंधिया, नारायण राणे, भूपेंद्र यादव इत्यादी आज शपथ घेणाऱ्यांमध्ये आहेत. तसेच जी किशन रेड्डी, पुरुषोत्तम रुपाला, अनुराग ठाकूर, हरदीपसिंग पुरी, मनसुख मंडावीया, आरके सिंग, किरेन रिजिजू यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -