Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश भारत जोडो यात्रेत पुन्हा आली रुग्णवाहिका आणि...

भारत जोडो यात्रेत पुन्हा आली रुग्णवाहिका आणि…

Subscribe

शनिवारी सकाळी भारत जोडो यात्रेने हरियाणातून दिल्लीत प्रवेश केला. त्यावेळी अपोलो रुग्णालयाजवळ ही घटना घडली. तेथे यात्रा पोहोचल्यानंतर रुग्णवाहिका आली. राहुल गांधी यांनी लगेच रुग्णवाहिकेला जागा करुन दिली. तसेच कार्यकर्त्यांनाही रुग्णवाहिकेला जागा करुन देण्यास सांगितले. त्यानंतर या यात्रेने आपला प्रवास पुन्हा सुरु केला. संध्याकाळी ही यात्रा लाल किल्ल्यावर पोहोचली. तेथे राहुल गांधी यांचे भाषण होणार आहे. 

नवी दिल्लीः संपूर्ण भारत फिरल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा शनिवारी राजधानी दिल्लीत पोहोचली. त्यावेळी या यात्रेत एक रुग्णवाहिका आली. राहुल गांधी यांनी या रुग्णवाहिकेला जागा करुन दिली. कार्यकर्त्यांनाही रुग्णवाहिकेला जागा करुन देण्यास सांगितले.

शनिवारी सकाळी भारत जोडो यात्रेने हरियाणातून दिल्लीत प्रवेश केला. त्यावेळी अपोलो रुग्णालयाजवळ ही घटना घडली. तेथे यात्रा पोहोचल्यानंतर रुग्णवाहिका आली. राहुल गांधी यांनी लगेच रुग्णवाहिकेला जागा करुन दिली. तसेच कार्यकर्त्यांनाही रुग्णवाहिकेला जागा करुन देण्यास सांगितले. त्यानंतर या यात्रेने आपला प्रवास पुन्हा सुरु केला. संध्याकाळी ही यात्रा लाल किल्ल्यावर पोहोचली.

- Advertisement -

याआधीही भारत जोडो यात्रेदरम्यान एक रुग्णवाहिका आली होती. २ डिसेंबर २०२२ रोजी उज्जेन येथे हा प्रकार घडला होता. तेथे एक किलोमीटर लांब वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकली होती. त्यावेळी पोलीस कर्मचारी आणि क्यूआरएफच्या जवानांनी ही रुग्णवाहिका बाहेर काढण्यासाठी लष्करी कारवाईप्रमाणे मार्ग काढला. याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता.

या व्हायरल व्हिडिओमध्ये पोलीस यात्रेदरम्यान रुग्णवाहिका बाहेर काढताना दिसत आहेत. पोलीस आणि क्यूआरएफच्या कर्मचाऱ्यांनी तीन मिनिटांत २५० हून अधिक वाहने हटवून रुग्णवाहिकेसाठी रस्ता तयार करण्यात आला. एका महिलेला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले जात होते. हे एकदा नव्हे तर दोन-तीन वेळा घडले. पोलीस आणि क्यूआरएफ जवानांनी प्रत्येक वेळी रुग्णवाहिका पुढे नेण्याची तयारी दाखवली.

- Advertisement -

आतापर्यंत भारत जोडो यात्रेने १२ राज्यातून प्रवास केला आहे. ३५७० कि.मी. चा प्रवास यात्रेने पूर्ण केला आहे. कोरोनाने चीनमध्ये पुन्हा उद्रेक केला आहे. त्यामुळे या यात्रेत कोरोना नियमांचे पालन करा अन्यथा ही यात्रा थांबवा असे केंद्र सरकारने राहुल गांधी यांना सांगितले. मात्र यात्रा थांबणार नाही, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले व यात्रा सुरुच ठेवली. दिल्लीतून ही यात्रा जम्मू-काश्मिरमध्ये जाणार आहे. तेथे या यात्रेची सांगता होणार आहे. प्रत्येक राज्यात भारत जोडो यात्रेचे जल्लोषात स्वागत झाले. महाराष्ट्रातही या जत्रेचे जंगी स्वागत झाले.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -