Video: भोपाळ रेल्वे स्थानकात ब्रिजचा भाग कोसळला, ६ जखमी

bhopal railway station accident
भोपाळ रेल्वे स्टेशन अपघात

मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ रेल्वे स्टेशनवर आज सकाळी एका ओव्हर ब्रिजचा स्लॅप कोसळून अपघात घडला आहे. या अपघातात ६ प्रवाशी गंभीर जखमी झाले असून यामुले रेल्वे स्थानकात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार मुख्य रेल्वे स्टेशनच्या दोन आणि तीन नंबर प्लॅटफॉर्मला जोडणारा ओव्हर ब्रिजच्या शिडीचा स्लॅप कोसळला. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना हमीदिया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.