Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी बिहारचे नेतृत्व नितीश कुमारांच्या हाती, पतंप्रधान नरेंद्र मोदींनी केलं स्पष्ट

बिहारचे नेतृत्व नितीश कुमारांच्या हाती, पतंप्रधान नरेंद्र मोदींनी केलं स्पष्ट

भाषणात बोलताना मोदी यांनी बिहारचा विकास हा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली होईल असे म्हणून या चर्चेला पूर्णविराम दिला.

Related Story

- Advertisement -

बिहारच्या निवडणूकानंतर दिल्लीत मोठा उत्साह पहायला मिळाला. दिल्लीच्या मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी करून उत्साह साजरा केला. या वेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा त्याचबरोबर भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा तसेच भाजपचे अनेक नेते या वेळी उपस्थित होते. बिहारमध्ये झालेल्या निवडणूकीत भाजपने आपली बाजी मारली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला.

नरेंद्र मोदींनी आज बिहार निवडणुकीवर भाषणात केले. या भाषणात बोलताना मोदी यांनी बिहारचा विकास हा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली होईल असे म्हणून या चर्चेला पूर्णविराम दिला. जे पक्ष फक्त कुटुंबापुरते मर्यादित आहेत अशी टिका काँग्रेस आणि इतर पक्षांवर केली. तरूणांनी भाजपासोबत येत देशाच्या विकासाठी सहभागी व्हावे असेही ते म्हणाले.देशाच्या विकासासाठी जे प्रामाणिकपणे कामे करतील त्यांनाच लोक निवडून देतात. जे विकासापासून दूर पळाले त्यांचे डिपॉझिट लोकांनी जप्त केले आहे,असा सणसणीत टोला यावेळी मोदींनी आपल्या भाषणातून दिला आहे. देशातील सगळ्यांचा भरोसा आता फक्त भाजपावर आहे असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

देशभर कमळ फुलले आहे. बिहार निवडणुकांचे महत्त्व हे खुप मोठे आहे. त्याचप्रमाणे देशातील सगळ्यांच राज्यात लोकांनी भाजपाचाच झेंडा फडकवला आहे. त्यामुळे आता भाजपाचा देशभर विस्तार झाला आहे असे पंतप्रधान मोदींनी भाषणात म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचे कौतुक ही केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर निवडणूका घेणे हे आव्हान होते. ते आव्हान सगळ्यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे त्यासाठी मोदींनी सगळ्यांचे आभार ही मानले.

बिहार विधानसभेच्या निवडणूकीत NDA ला बहुमत मिळाले. भाजपाला जास्त जागा मिळाल्या नसल्या तरी नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री असतील असे मोदींनी सांगितले आहे. त्यामुळे नितीश कुमार हे सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

- Advertisement -