घरदेश-विदेशBihar Election 2020: निकालाआधीच काँग्रेसला आमदार फूटण्याची भीती; सुरजेवाला पाटण्यात दाखल

Bihar Election 2020: निकालाआधीच काँग्रेसला आमदार फूटण्याची भीती; सुरजेवाला पाटण्यात दाखल

Subscribe

बिहारच्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला आहे. बिहारच्या २४३ विधानसभा जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबरला लागणार आहे. दरम्यान, एक्झीट पोलमध्ये विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांची सत्ता जाणार असून राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेतृत्त्व असलेले महागठबंधन सरकार स्थापन होणार असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर आमदारांचा घोडेबाजार होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे काँग्रेसने आधीच खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे.

काँग्रेस आता चांगलीच सक्रिय झाली आहे. मतमोजणीनंतर काँग्रेसने आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी दोन वरिष्ठ नेत्यांना पाटण्यात पाठवले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाचे सरचिटणीस अविनाश पांडे आणि रणदीपसिंग सुरजेवाला यांना पटना येथे पाठवले आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर परिस्थिती व्यवस्थापनाची जबाबदारी देऊन या दोन नेत्यांना पाठविण्यात आले आहे.

- Advertisement -

सूत्रांच्या माहितीनुसार एग्जिट पोलमध्ये सत्तारूढ जनता दल युनायटेड (जेडीयू) च्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महागठबंधनमध्ये कांटे की टक्कर आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षातील आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. हे पाहता दोन्ही नेत्यांना पाटण्यात पाठविण्यात आले आहे. हे दोन्ही नेते बिहारमध्ये राहतील आणि महागठबंधनमधील भागीदारांशी समन्वय राखतील.

महागठबंधनमध्ये आरजेडीसह काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश आहे. तर जेडीयू, भारतीय जनता पक्ष (भाजपा), जीतन राम मांझी यांचा हिंदुस्तानी अवाम मोर्चा पक्ष, मुकेश साहनीचा विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी) एनडीएत आहेत. जर एनडीए बहुमतासाठी आवश्यक असलेल्या १२२ जागांच्या जवळ पोहोचला तर विरोधी पक्षातून आमदार एनडीएत आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे काँग्रेस आधीच सावध झाली आहे. काँग्रेसने आपल्या सर्व उमेदवारांना स्पष्टपणे सांगितले आहे की विजयी झाल्यास त्यांनी विजयी मिरवणुकीत सामील होऊ नये आणि प्रमाणपत्र मिळवून थेट पटना येथे जावे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना पाटण्यातील हॉटेलमध्ये ठेवण्याची योजना आखली आहे. निकाल एक्झिट पोलनुसार लागल्यास महागठबंधन सरकार स्थापन होणे निश्चित आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -