घरताज्या घडामोडीवडील करत होते मुलीवर बलात्कार; अटक केल्यानंतर रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह!

वडील करत होते मुलीवर बलात्कार; अटक केल्यानंतर रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह!

Subscribe

आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने पोलीस आणि न्यायालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कोरोनाच्या काळात अनेक खळबळजनक घटना घडल्याचे समोर येत आहेत. दरम्यान बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील एका वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहेत. याप्रकरणी मुलीच्या आईने आपल्या पती विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नियमानुसार या आरोपी वडिलांना ताब्यात घेण्यापूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली होती. सोमवारी आरोपीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे पोलीस आणि न्यायालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कारण या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात दाखल केले होते त्यानंतर त्याला तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाने संपर्कात आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला आहे.

नक्की काय घडले?

माहितीनुसार, १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे वडील दुबईत काम करत होते. पण काही महिन्यांपूर्वी तिचे वडील दुबईहून बिहारला परत आले होते. मुलीने पोलिसांना सांगिल्याप्रमाणे, फेब्रुवारी महिन्यापासून मुलीच्या वडिलांनी तिच्यासोबत घृणास्पद प्रकार करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळेस तिने आपल्या आईला हा सर्व प्रकार सांगितला. पण त्यावेळेस वडिलांनी आई आणि तिला धमकी दिली आणि त्यांना मारहाण केली. त्यानंतर सतत धमकी देत वडिलांनी तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. अलीकडेच पीडित मुलीच्या आईने स्थानिक पोलीस ठाण्यात पती विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांना पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आणि रविवार आरोपी वडिलांना ताब्यात घेतले.

- Advertisement -

पीडित मुलीला १६ वर्षांचा भाऊ आणि २ बहिणी आहेत. या पीडित मुलीचा भाऊ या सर्व प्रकाराला विरोध करत होता पण वडील त्याला देखील धमकी देत असत. मुलीचे वडील जुगार आणि दारू पित असत हे देखील समोर आले आहे. हे सर्व कृत्य लपविण्यासाठी आरोपी वडील कोणालाही घरात घेत नसत.


हेही वाचा – भूत उतरवण्यासाठी महिलेला मारहाण केली, पण झालं भलतच…!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -