घरदेश-विदेशपाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासात बिकानेर सोडा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासात बिकानेर सोडा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Subscribe

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर राजस्थानमधील बिकानेरमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासामध्ये जिल्हा सोडण्याचे आदेश जारी केले आहेत. बिकानेरचे जिल्हाधिकारी कुमारपाल गौतम यांनी हे आदेश जारी केले.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर राजस्थानमधील बिकानेरमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासामध्ये जिल्हा सोडण्याचे आदेश जारी केले आहेत. बिकानेरचे जिल्हाधिकारी कुमारपाल गौतम यांनी हे आदेश जारी केले. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशांची एक यादीच जाहीर केली आहे. त्यानुसार बिकानेरमध्ये कलम १४४ देखील लागू करण्यात आले आहे. त्यांनी यामध्ये असे आदेश दिले आहेत की, पाकिस्तानी नागरिकांनी पुढच्या ४८ तासामध्ये बिकानेर जिल्हा सोडावा. त्याचसोबत त्यांनी असे सुध्दा म्हटले आहे की, बिकानेरच्या सीमाभागामध्ये असणाऱ्या हॉटेलमध्ये पाकिस्तानी नागरिकांच्या राहण्यावर देखील बंदी घालावी. हे आदेश पुढच्या दोन महिन्यासाठी लागू करण्यात आले आहे.

- Advertisement -

पाकिस्तानच्या खुरापती सुरुच

पुलवामामाध्ये झालेल्या दहशतवादी भ्याड दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या घटनेचा देशभरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. पाकिस्तानचा बदला घ्याच अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. असे असताना पाकिस्तानच्या खुरापती काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. सोमवारी पुन्हा पुलवामा जिल्ह्याच्या पिंगलिना येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ५ जवान शहीद झाले. या शहीद जवानांमध्ये राजस्थानमधील एस. राम यांचा समावेश आहे.

जैश-ए-मोहम्मदच्या २ कमांडरचा खात्मा

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सोमवारी पुन्ही पिंगलिना भागामध्ये चकमक झाली. या चकमकीत शहीद झालेल्या जवानांमध्ये राजस्थानमधील एस. राम यांचा देखील समावेश होता. त्यांचे पार्थिव काल रात्री उशिरा राजस्थानमध्ये पोहचले. पिंगलिना भागात झालेल्या चकमकीत जवानांना ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. जवानांनी दहशतवादी लपून बसलेली इमारतच उध्वस्त केली. या चकमकीत जवानांना पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मदचे दोन टॉप कमांडर यांचा खात्मा करण्यात यश आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -