घरदेश-विदेशमोदींनी दिल्या मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा!

मोदींनी दिल्या मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा!

Subscribe

गेल्या पाच वर्षात त्यांनी महाराष्ट्रात विकासाची नवी उंची गाठली. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आज २२ जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाढदिवसानिमित्त देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देतांना पंतप्रधान मोदींनी ”महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आक्रमक, धडाडीचे नेते आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी महाराष्ट्रात विकासाची नवी उंची गाठली. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गरीबांच्या विकासासाठीही चांगले काम केले आहे. त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो…” असे ट्विट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवरून शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक देखील केले आहे. यासोबतच आता त्यांच्या वाढदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना विशेष शुभेच्छाही दिल्या आहेत. तसेच देवेंद्र फडणीस हे धडाडीचे नेते आहेत, असा देखील उल्लेख केला आहे.

- Advertisement -

 असे दिसतेय आज मुख्यमंत्र्यांचे ट्विटर अकाऊंट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -