भाजप खासदार रिटा बहुगुणांच्या नातीचा फटाक्यांनी भाजून मृत्यू

भारतीय जनता पक्षाच्या खासदार रिटा बहुगुणा-जोशी यांच्या सहा वर्षाच्या नातीचा फटाक्यानी भाजून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

bjp mp rita bahuguna joshi 6 year old granddaughter dies after being burnt by firecrackers
भाजप खासदार रिटा बहुगुणांच्या नातीचा फटाक्यानी भाजून मृत्यू

भारतीय जनता पक्षाच्या खासदार रिटा बहुगुणा-जोशी यांच्या सहा वर्षाच्या नातीचा फटाक्यानी भाजून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दिवाळीच्या दिवशी रिटा बहुगुणा फटाके फोडत होती. त्याचवेळी एक फटाका उडाला आणि त्यातच किया बहुगुणा गंभीररित्या भाजली. सुरुवातीला तिला प्रयागराजच्या एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचाराकरता दाखल केले होते. मात्र, प्रकृती अधिक गंभीर झाल्याने तिला एअर रुग्णवाहिकेने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिने आज पहाटे जगाचा निरोप घेतला.

भारतीय जनता पक्षाच्या खासदार रिटा बहुगुणा-जोशी यांची नात किया बहुगुणा फटाके फोडताना भाजली. ती तब्बल ६० टक्क्यांहून अधिक भाजली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यातच कियाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, संपूर्ण प्रकाराने भाजप खासदार रिटा बहुगुणा आणि त्यांच्या कुटुंबीयांना फार मोठा धक्का बसला आहे.

यावेळी चिमुकली तब्बल ६० टक्क्यांहून अधिक भाजली असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. सुरुवातीला मुलीवर प्रयागराजच्या खासगी रुग्णालयात प्राथमिक सुरू होते. मात्र, प्रकृती अधिक गंभीर झाल्याने तिला एअर रुग्णवाहिकेने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच तिने या जगाचा निरोप घेतला. दरम्यान, संपूर्ण प्रकाराने भाजप खासदार रिटा बहुगुणा आणि त्यांच्या कुटुंबीयांना फार मोठा धक्का बसला आहे.

खासदार रिटा बहुगुणा यांनी नातीवर तात्काळ उपचार व्हावेत, यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला होता आणि चांगल्या उपचारांसाठी मदत मागितली होती. यानंतर त्यांच्या नातीला दिल्लीतील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात येणार होते पण, आज पहाटे तिचे निधन झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; सहा वर्षीय किया बहुगुणा ही काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरी होऊन घरी परतली होती. गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात तिच्यासह आजी रिटा बहुगुणा आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांसह उपचार करण्यात आले होते. अलाहाबाद लोकसभा मतदार संघातील भाजप खासदार रिटा जोशी या योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री देखील होत्या.


हेही वाचा – बाळ होण्यासाठी सात वर्षाच्या मुलीचे पुजले यकृत