घरताज्या घडामोडीUP Election BJP Manifesto 2022: मोफत स्कुटी, सिलेंडर अन् टॅबलेट, यूपी विधानसभेसाठी...

UP Election BJP Manifesto 2022: मोफत स्कुटी, सिलेंडर अन् टॅबलेट, यूपी विधानसभेसाठी भाजपचा जाहीरनामा घोषित

Subscribe

उत्तर प्रदेशातही शिवभोजन थाळीचा पॅटर्न

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला काही तास शिल्लक असतानाच, भाजपचा उत्तर प्रदेश निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. लोक कल्याण संकल्प पत्र -२०२२ असे या जाहीरनाम्याला नाव देण्यात आले आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेशात भाजपला संपूर्ण बहुमत द्यावे, अशीही विनंती त्यांनी केली. उत्तर प्रदेशातील जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर अमित शाह म्हणाले की, आम्ही लता मंगेशकर यांचे संगीत क्षेत्रासाठीचे योगदान पाहता एक लता मंगेशकर परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी स्थापना करणार आहोत. उत्तर प्रदेशात बहुमतासाठी भाजपला ३०० हून अधिक जागा मिळवून द्याव्यात. तसेच जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असेही शाह म्हणाले. सत्तेत आल्यानंतर ज्या व्यक्ती लव जिहादमध्ये सामील होतील, अशा व्यक्तींसाठी १० वर्षांची शिक्षा आणि एक लाख रूपयांचा दंड सुनावण्यात येईल, अशीही घोषणा त्यांनी केली.

- Advertisement -

जाहीरनाम्याला उत्तर प्रदेश सरकारचा संकल्प म्हणून संबोधले

अमित शाह यांनी २०२२ च्या भाजपच्या जाहीरनाम्याला उत्तर प्रदेश सरकारचा संकल्प म्हणून संबोधले आहे. सत्ताधारी असलेल्या भाजप सरकराने याआधीच्या २०१७ च्या जाहीर नाम्यातील ९२ टक्के आश्वासने पूर्ण केली असल्याचाही दावा त्यांनी केला. आम्ही तेच करतो, जे आम्ही सांगतो. सर्व शेतकऱ्यांना मोफत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देतानाच, ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना १४ दिवसांमध्ये परतावा मिळवून देण्यात येईल, असेही आश्वासन देण्यात आले आहे.

जाहीर नाम्याची वैशिष्ट्ये आणि घोषणा

– ६० वर्षांहून अधिक वयाच्या महिलांना मोफत प्रवास
– राणी लक्ष्मी बाई योजनेअंतर्गत हुशार विद्यार्थ्यांना मोफक स्कुटी
– सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांची संख्या दुप्पट होईल
– सामुदायिक विवाह अनुदानात १ लाख रूपयांचे वित्तीय सहाय्य
– होळी, दिवाळीला मोफत सिलेंडर
– मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेतील मदत १५ हजारांवरून २५ हजार रूपये
– आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सर्व अंगणवाडी कार्यकर्त्यांना विम्याचे कवच

- Advertisement -

– शेतकरी सौर पंपासाठी वित्तीय सहाय्य
– शैक्षणिक संस्थांजवळ सीसीटीव्ही कॅमेरा
– प्रत्येक गावात १०० टक्के पाणी योजना
– ३००० पिंक पोलीस बूथ

दोन कोटी टॅबलेट वाटणार

अवंती बाई लोधी स्वयं सहायता समहू मिशन अंतर्गत ५ हजार कोटी रूपयांच्या गुंतवणुकीतून एकुण ५ लाख नव्या बचत गटांची निर्मिती केली जाईल. तसेच स्वामी विवेकानंद युवा सशक्तिकरण योजनेअंतर्गत दोन कोटी टॅबलेट आणि स्मार्टफोनही वितरीत करण्यात येतील. तर उत्तर प्रदेशात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मेचर ध्यानचंद्र स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर मिशनची सुरूवात करण्यात येणार आहे.

गरीबांसाठी शिवभोजन थाळीचा पॅटर्न

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, मॉं अन्नपूर्ण कॅन्टीनची स्थापना केली जाईल. या योजनेअंतर्गत गरीबांसाठी स्वस्तात जेवणाची व्यवस्था केली जाईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर भाजप नेतेही या जाहीरनाम्याच्या घोषणेसाठी उपस्थित होते. दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत लोक कल्याण संकल्प पत्र २०२२ ची घोषणा करण्यात आली. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारीला मतदान होणार आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -