घरAssembly Battle 2022Uttarakhand Election 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडच्या नागरिकांना दिली आश्वासनं, विरोधकांवर...

Uttarakhand Election 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडच्या नागरिकांना दिली आश्वासनं, विरोधकांवर साधला निशाणा

Subscribe

पाच राज्यांच्या विधानसभेच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या उधमसिंह नगर आणि नैनीतालच्या मतदारांना संबोधित केलं. यादरम्यान त्यांनी विरोधी पक्षावर टीकेची झड उठवली आहे. अमृत काळात उत्तराखंड आणि देशाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी ही निवडणूक आमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. असं पीएम मोदी म्हणाले.

ही निवडणूक पुढील २५ वर्षांचा पाया मजबूत करणार

ही निवडणूक या दशकामध्ये उत्तराखंडचं दशक बनवण्यात मोठी भूमिका पार पाडणार आहे. ही निवडणूक पुढील २५ वर्षांचा पाया मजबूत करेल. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उत्तराखंडच्या प्रत्येक गावातील आपल्या शूर मातांनी आपल्या मुलांना देशाच्या स्वाधीन केले. त्या सर्व बलिदानांचे देश आज स्मरण करत आहे,असं मोदी म्हणाले.

- Advertisement -

१० फेब्रुवारी रोजी श्रीनगरमध्ये तुमच्याशी संवाद साधणार

आज मी सर्वांशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडलो गेलो आहे. निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच तुम्हाला भेटण्याची संधी मिळेल. हे माझं भाग्य आहे. त्यामुळे पर्वा म्हणजेच १० फेब्रुवारी रोजी उत्तराखडंच्या श्रीनगरमध्ये पोहोचणार आहे. तुमचे दर्शन घेणार आहे. तसेच तुमच्याशी संवाद देखील साधणार आहे.

विरोधकांवर साधला निशाणा

इतकी वर्ष उत्तर प्रदेशमध्ये यांचं सरकार होतं. तेव्हा उत्तराखंड उत्तर प्रदेशचा भाग होता. मात्र, त्यावेळी केदारधाम, बद्रीधाम, गंगोत्री, यमुनोत्री यांची आठवण त्यांना झाली नाही. उत्तराखंडच्या नागरिकांसाठी कनेक्टिविटी किती गरजेचं आहे, हे त्यांना समझलेलचं नाहीये, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.

- Advertisement -

काँग्रेसची निती आणि निष्ठा काय आहे. दिल्लीमध्ये हे त्यांच्या दशकापर्यंत सत्तेमध्ये राहीले. त्यांचे नेता दिल्लीमध्ये फेरफटका मारण्यासाठी येत राहीले. मात्र, त्यांना चारधामची आठवण झाली नाही. काँग्रेस पक्ष जे काही कार्य करतात, ते त्यांच्या कुटुंबियांसाठी करतात. हे जे काही कार्य करतील त्यामध्ये भ्रष्टाचार असतो म्हणजे असतोच. हे राजकारण मोठ्या प्रमाणात करतात. अनेक योजनांमध्ये भेदभाव करतात, असा हल्लाबोल मोदींनी काँग्रेसवर केला.

तुमचं आणि माझं एक विशेष नातं

दरम्यान, उत्तराखंडची धरती आणि तुमच्यासोबत माझं एक विशेष नातं राहीलेलं आहे. मी तुमच्यासोबत, तुमच्यामध्ये राहीलो आहे. तुम्ही मला चांगल्या प्रकारे ओळखता. तुमच्या भावना आणि तुमच्या स्वप्नांच्याबाबतीत मला माहिती आहे, असं प्रकारचा विश्वास मोदींनी उत्तराखंडच्या नागरिकांना दिला आहे.


हेही वाचा : OBC Reservation : ओबीसी आरक्षणासंदर्भाचा इम्पेरिकल डेटा सुप्रीम कोर्टात सादर, मुख्यमंत्र्यांनाही प्रत सुपुर्द


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -