घरदेश-विदेशयंदा परेडमध्ये धाडसी मुलांचा सहभाग नाही

यंदा परेडमध्ये धाडसी मुलांचा सहभाग नाही

Subscribe

प्रजासत्ताक दिनी दिल्लीला होणाऱ्या परेडमध्ये दरवर्षी सहभागी होणारी धाडसी मुलं यंदा सहभागी होणार नाहीत.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीला होणाऱ्या परेडमध्ये दरवर्षी सहभागी होणारी धाडसी मुलं यंदा सहभागी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. दरवर्षी परेडमध्ये २० धाडसी मुलांचा सहभाग असतो. तसेच या मुलांची निवड इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड वेल्फेयर (आयसीसीडब्ल्यू) यांच्याकडून केली जाते. मात्र आयसीसीडब्ल्यूवर आर्थिक अनियमिततेचा आरोप झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिलं आहे.

१९५७ पासून मुलांना करण्यात येते सन्मानित

वर्षभरात शौर्याने कुणाचे तरी प्राण वाचवणाऱ्या मुलांना १९५७ पासून सन्मानित करण्यात येत. हत्तीवर बसून ही धाडसी मुलं प्रजासत्ताक दिनानिमित्त परेडमध्ये सहभागी होतात. या मुलांची निवड करण्याची जबाबदारी आयसीसीडब्ल्यू या बिगर सरकारी संस्थेवर आहे. मात्र आयसीसीडब्ल्यूवर आर्थिक अनियमिततांचे काही आरोप करण्यात आले असून दिल्ली उच्च नायालयात त्यावर सुनावणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने आयसीसीडब्ल्यूशी असलेले सर्व संबंध तोडले आहेत. यामुळेच कोणत्याही धाडसी मुलाला प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होता येणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

- Advertisement -

शौर्य पुरस्कारांची घोषणा

सरकारने धाडसी मुलांसाठी पंतप्रधान शौर्य पुरस्कारांची घोषणा केली आहे. यासाठी २६ मुलांची निवडही करण्यात आली आहे. परंतु हे पुरस्कार कधी देण्यात येतील याबद्दल मात्र संभम्र व्यक्त केला जात आहे. ‘प्रजासत्ताक दिनाला मुलांना परेडमध्ये घेणार की नाही यासंदर्भात आम्ही पंतप्रधान आणि केंद्र सरकारला भरपूर पत्र लिहिली आहेत. पण त्यांच्याकडून कोणतंच उत्तर आलेलं नाही’. अशी माहिती आयसीसीडब्ल्यूच्या गीता सिद्धार्थ यांनी सांगितली आहे. तसेच आर्थिक अनियमिततांच्या आरोपांबद्दल मात्र त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.


वाचा – फॅशनमध्येही तिरंग्याची क्रेझ

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -