Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कॉलेजची फी भरण्यासाठी प्रायव्हेट फोटो online विकले, पण कॉल्सने आता...

कॉलेजची फी भरण्यासाठी प्रायव्हेट फोटो online विकले, पण कॉल्सने आता…

Related Story

- Advertisement -

जगभरात कोरोनाच्या महामारीमुळे अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची आकडेवारी दिवसेंदिवस समोर येत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे आर्थिक कणा मोडलेल्या अनेक व्यक्तींना अतिशय गंभीर अशा स्वरूपाची पावले उचलावी लागत आहेत. कोरोनाच्या महामारीचा परिणाम हा फक्त नोकरदारांवरच नाही, तर विद्यार्थ्यांवरही झाला आहे. ब्रिटनच्या विद्यार्थींनींना कोरोनाच्या महामारीचे संकट पाहता एका वेगळ्याच समस्येला सध्या तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाच्या महामारीचा फटका म्हणजे अनेक विद्यार्थीनींचे या कोरोनाच्या कालावधीत पार्ट टाईम काम सुटले अशा विद्यार्थीनींना अतिशय वेगळ्या मार्गांचा पर्याय पैसे कमावण्यासाठी करावा लागल आहे. रेस्टॉरंट, पब आणि बार बंद झाल्याने बेरोजगार झालेल्या विद्यार्थींनींनी आपले प्रायव्हेट फोटो शेअर करून ऑनलाईन पैसे कमावले खरे, पण या विद्यार्थीनींना सेक्स वर्कशी संबंधित कॉल येण्याचे प्रकार समोर येत आहेत.

इंग्लिश कलेक्टिव्ह ऑफ प्रॉस्टीट्यूट या संस्थेला विद्यापीठ आणि कॉलेजशी संबंधित सेक्स वर्कशी संबंधित कॉल्स येत आहेत. महत्वाचे म्हणजे २०२१ सालामध्ये या कॉल्समध्ये तिप्पट वाढ झाली आहे. इंग्लिश कलेक्टिव्ह ऑफ प्रॉस्टीट्यूट या संस्थेत काम करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच अनेक विद्यार्थींनीना शैक्षणिक वर्षासाठीच्याही अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संस्थेच्या प्रवक्ता असलेल्या लॉरा वॉटसन यांनी मिरर या वेबसाईटला स्पष्ट केले की, कॉलेज – ट्यूशन फी भरण्यासाठी अनेक विद्यार्थीनींना कोरोनाच्या संकट कालावधीत वेश्याव्यवसाय करून आपला खर्च भागवावा लागत आहे. कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या सुटल्यानेच विद्यार्थीनींना हे पाऊल उचलावे लागत आहे.

- Advertisement -

अनेक विद्यार्थीनी या मॉल्स, दुकाने, पर किंवा बारमध्ये काम करतात. पण कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यींनींच्या या पार्ट टाईम प्रोफेशन बंद होण्याचा फटका बसला आहे. अनेक पार्ट टाईम जॉब्स बंद झाल्यानेच विद्यार्थीनींचा वेश्या व्यवसायाच्या कामाकडे वळण्यासाठी नाईलाज झाला. इंग्लिश कलेक्टिव्ह ऑफ प्रॉस्टीट्यूट ही संस्था १९७५ साली सुरू झाली. या संस्थेचा उद्देश हा वेश्या व्यवसायात असणाऱ्या महिलांना त्यांच्या अधिकाराबाबतीत जागरूक करणे हे आहे. तसेच या महिलांची सुरक्षा करणे हेदेखील संस्थेचे उदिष्ट आहे. ब्रिटनमध्ये जेव्हा लॉकडाऊनला सुरूवात झाली, तेव्हा अनेक महिलांनी ओनलीफॅन्स यासारख्या वेबसाईटवर आपले हॉट फोटो शेअर केले. त्यामध्ये अनेक महिलांना या साईट्सवर खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामधून चांगले पैसेही कमावणे या महिलांना शक्य झाले. तर अनेक महिलांना खूपच वाईट अनुभवही या सगळ्या प्रकारात आला आहे. अनेक विद्यार्थींनीकडून आलेल्या तक्रारीनुसार प्रायवेट फोटोचा कंटेंट हा रिपोस्ट करण्याचा अनुभव काही विद्यार्थीनींनी सांगितला. तर काही क्लायंट्सने त्यांचे पर्सनल डिटेल्स सोशल मिडिया वेबसाईटवर पोस्ट करण्यात आल्याचाही अनुभव सांगितला. त्यामुळेच या महिला आणि विद्यार्थींनींना वेबसाईट्सचा वापर करणे हे खूपच आव्हानात्मक होत आहे अशीही माहिती समोर आली आहे.

गतवर्षी २०२० मध्ये ३२०० विद्यार्थ्यांचे एक सर्वेक्षण झाले होते. त्यामध्ये चार टक्के मुलींनी कबुल केले की आपल्या कोर्सची फी भरण्यासाठी त्यांनी वेश्या व्यवसायाचा आधार घेतला. तर १० टक्के विद्यार्थीनींनी सांगितले की जेव्हा त्यांच्याकडे पैशाची कमतरता व्हायची त्यावेळी या मुलींकडून वेश्याव्यवसायातून पैसे कमावण्यात आले. गेल्या एका दशकात ब्रिटमधील कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात फी वाढवण्यात आली आहे. तर कोरोनाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाचे कंबरडे मोडले आहे. या अडचणीत अनेक महिला आणि विद्यार्थीनींनी आपल्या घरच्या व्यक्तींना याबाबतची माहिती दिलेली नाही. तर दुसरीकडे शैक्षणिक खर्च कमी करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी वर्कर्स ऑफ इंग्लंड युनियनच्या माध्यमातून एक अभियानही चालवले आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -