घरताज्या घडामोडीCovid-19 India: ऑक्सिजन अभावी बहिणीचा मृत्यू; भावाने शाळेत बनवले ऑक्सिजनयुक्त बेड्सचे हॉस्पिटल

Covid-19 India: ऑक्सिजन अभावी बहिणीचा मृत्यू; भावाने शाळेत बनवले ऑक्सिजनयुक्त बेड्सचे हॉस्पिटल

Subscribe

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून यामुळे काही राज्यांमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान बिहारमधील बेगुसराई येथील एका तरुणाच्या बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता होती. त्यामुळे ऑक्सिजन न मिळाल्याने त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला. त्यानंतर भावाने कोरोनामुळे इतर कोणाचा जीव जाऊ नये यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले. या तरुण भावाने आपल्या शाळेचे कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरित केले. जिथे ऑक्सिजनयुक्त ३० बेड्सची व्यवस्था केली आहे.

बेगुसराईच्या दून शाळेचे व्यवस्थापक पंकज कुमारच्या बहिणीला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे पंकज कुमारने आपल्या बहिणीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण हॉस्पिटमध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्याने २७ एप्रिलला पंकजच्या बहिणीचा मृत्यू झाला. बहिणीच्या मृत्यूनंतर पंकज खूपच खचून गेला. पंकजने सांगितले की, ‘जेव्हा त्याच्या बहिणीवर उपचार होत होते, तेव्हा बऱ्याच रुग्णांनी ऑक्सिजन अभावी प्राण सोडल्याचे त्याने पाहिले.’

- Advertisement -

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अजून कोणाचा जीव जाऊ नये, यामुळे पंकज कुमारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले. कोरोना काळात बंद असलेल्या शाळेचे रुपांतर त्याने हॉस्पिटलमध्ये केले. जिथे ऑक्सिजनयुक्त ३० बेड्सची व्यवस्था केली आहे. शाळेच्या व्यवस्थापकाने जिल्हाधिकारी बेगुसराईला निवेदन दिले आणि या मिनी हॉस्पिटमध्ये डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी केली. जेणेकरून हॉस्पिटल चालू केले जाईल.

माहितीनुसार, या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचा खर्च शाळेच्या मार्फत केला जाईल. फक्त जिल्हा प्रशासनाने रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर तैनात करावे, असे व्यवस्थापकाने मागणी केली आहे.

- Advertisement -

या शाळेतील हॉस्पिटलमध्ये ३० बेड्स तयार करण्यात आले असून बेड्सच्या बाजूला पाईपलाईनद्वारे ऑक्सिजनची व्यवस्था केली गेली आहे. शाळेत डझनभर संख्येने ऑक्सिजन सिलिंडर ठेवले आहेत. जेणेकरून रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू होऊ नये. तर दुसऱ्या बाजूला सिव्हिल सर्जनने सांगितले की, ‘सध्या सदर हॉस्पिटल आणि सरकारी व्यवस्था पुरेशी आहे. त्यामुळे याक्षणी वेगळे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी तैनात करू शकणार नाही.’


हेही वाचा – Coronavirus: कोरोना विषाणूवर वर्षभर काम करूनही लागण नाही!


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -