घरदेश-विदेशBudget 2019 : केंद्रीय अर्थसंकल्पात सामान्यांसाठी काय?

Budget 2019 : केंद्रीय अर्थसंकल्पात सामान्यांसाठी काय?

Subscribe

केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज संसदेत सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सादर करणार असून देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून त्यांनी सादर केलेला हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे.

जीएसटी अर्थव्यवस्थेची मुळे मंदावलेली गती, कृषी क्षेत्रातील विकासाची घसरण यांसह गुंतवणूकीला चालना देणे, रोजगार निर्मितीत वाढ करणे, महागाईला आळा घालणे अशी अनेक आव्हाने यंदा सरकारसमोर आहेत. नोकरदार व मध्यमवर्गींयांसाठी आयकराच्या मर्यादेत पुन्हा वाढ होणार का? याकडेही सामान्यांचे लक्ष आहे.

- Advertisement -

काल निर्मला सीतारामन यांनी देशाच्या आर्थिक पाहणी अहवाल संसदेच्या पटलावर मांडला होता. त्यात कृषी क्षेत्राच्या विकासदरात घट झाल्याचे म्हटले होते. भारतातील ६० टक्के जनता ही शेतीवर अवलंबून असल्याने आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ही शेतीशी जोडलेली असल्याने या क्षेत्रातील प्रगतीसाठी ठोस पावले उचलण्याचे आव्हान आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात काय तरतुदी करतात ते पाहणे इष्ट ठरेल.

रेल्वेचा अर्थसंकल्पही याच अर्थसंकल्पात सादर करण्याची प्रथा मोदी सरकारनंतर सुरू झाली. अनेक रेल्वेमार्गांची कामे प्रस्तावित आहे. महाराष्ट्रात इंदूर मनमाड, नाशिक पुणे असे रेल्वे मार्ग प्रस्तावित आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलचे तिकीटदर वाढणार की तसेच राहणार? गाड्यांची संख्या आणि वारंवारता वाढणार का? याकडे मुंबईकरांचे लक्ष आहे.

- Advertisement -

अशी आहे सीतारामन यांची टीम

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या ‘टीम’मध्ये अनुराग ठाकूर हे अर्थराज्यमंत्री आहेत, तर कृष्णमूर्ती सुब्रमण्यम हे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. अधिकाऱ्यांच्या टीमचे नेतृत्व अर्थ सचिव सुभाष चंद्र गर्ग, खर्च सचिव गिरीश चंद्र मुर्मु, राजस्व सचिव अजय भूषण पांडेय, अतनु चक्रवर्ती, राजीव कुमार हे वरिष्ठ अधिकारी करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -