घरअर्थसंकल्प २०२२Budget 2022 : संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेवर भर, ६८ टक्के संरक्षण सामग्री देशात...

Budget 2022 : संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेवर भर, ६८ टक्के संरक्षण सामग्री देशात बनणार

Subscribe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022) संसदेत सादर करत आहेत. केंद्राने यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासंदर्भात (Defence Sector) मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकार संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भतेवर भर देणार आहे. लष्करासाठी लागणाऱ्या सामग्रीसाठी निर्यातीवर अवलंबून न राहता आत्मनिर्भर राहण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी ६८ टक्के संरक्षण सामग्री देशात बनणार असल्याची घोषणा निर्मला सितारमण यांनी केली.

संरक्षण क्षेत्रासंदर्भात घोषणा करताना निर्मला सितारमण यांनी लष्करासाठी लागणाऱ्या सामग्रीसाठी निर्यातीवर अवलंबून न राहता आत्मनिर्भर राहण्यावर भर दिला जाणार असल्याचं सांगितलं. संशोधन आणि विकास इतर क्षेत्रांसाठी, उद्योगांसाठी खुलं केलं जाईल. स्टार्टपअपही यात सहभागी होऊ शकतील. लष्कराच्या बजेटमधील २५ टक्के यासाठी दिले जाणार असल्याची घोषणा निर्मला सितारमण यांनी केली.

- Advertisement -

३.८ कोटी घरांमध्ये नळाचं पाणी पोहोचवण्यासाठी ६० हजार कोटी

घरांमध्ये पाणी पोहोचवण्यासंदर्भात निर्मला सितारमण यांनी मोठी घोषणा केली आहे. ३.८ कोटी घरांमध्ये नळाचं पाणी पोहोचवण्यासाठी ६० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं निर्मला सीतारामन यांनी संसदेत सांगितलं.

- Advertisement -

पीएम आवास योजनेसाठी ४८ हजार कोटींची नव्याने तरतूद

पंतप्रधान आवास योजनेसाठी नव्याने तरतूद करण्यात आली आहे. शहरी आणि ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेसाठी ४८ हजार कोटींची नव्याने तरतूद करण्यात आली आहे. मध्यमवर्गीय आणि गरिबांना परवडणारी घरं मिळावीत यासाठी खासगी बिल्डरांशी चर्चा करणार असून मध्यस्थांमुळे वाढणारा खर्च कमी करण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती निर्मला सितारमण यांनी दिली. पुढे त्यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ८० लाख घरं बांधणार असल्याचं देखील जाहीर केलं.


हेही वाचा – Budget 2022 : शेतकऱ्यांना डिजिटल सेवा पुरवणार, धान्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा


Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -