घरदेश-विदेशउद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली ममता बॅनर्जींची भेट; गुंतवणूक पर्यायांवर चर्चा

उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली ममता बॅनर्जींची भेट; गुंतवणूक पर्यायांवर चर्चा

Subscribe

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती उद्योगपती गौतम अदानी यांनी गुरुवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राज्य सचिवालय ‘नबान्ना’ येथे भेट घेतली. बंगालमधील गुंतवणुकीच्या पर्यायांवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती अदानी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बैठक सुमारे दीड तास चालली. या बैठकीला तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जीही उपस्थित होते. बैठकीत राज्यातील गुंतवणुकीच्या संभाव्य पर्यायांवर चर्चा करण्यात आली. ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावरून परतल्यानंतर झालेल्या या बैठकीला महत्त्व आहे. कारण बॅनर्जी यांनी राज्य गुंतवणुकीसाठी खुले असल्याचे सांगितले होते. अंबानी आणि अदानीसारखे गुंतवणूकदार बंगालमध्ये यावेत अशी राज्याची इच्छा आहे, असेही त्या म्हणाल्या होत्या. सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहील आणि त्यांना शक्य ती सर्व मदत करेल.

- Advertisement -

अदानी यांनी यापूर्वीच राज्यात हल्दियामध्ये गुंतवणूक केली आहे आणि राज्यात अधिक गुंतवणूक करण्यात रस दाखवत आहे. बॅनर्जी यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बंगाल ग्लोबल बिझनेस समिटचे उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित केले होते, ज्यासाठी त्यांनी त्यांची प्राथमिक संमती दिल्याची माहिती आहे.

मुंबई दौऱ्यात ममता यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबतच गीतकार आणि लेखक जावेद अख्तर आणि कलाकार स्वरा भास्कर यांसारख्या नेत्यांची भेट घेतली. ममता बॅनर्जी सध्या २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपविरोधात विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -